पंतप्रधान कार्यालय
सौरऊर्जा, कृषी आणि सामुहिक समृद्धी यावरील लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
17 JUN 2026 4:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जून 2026
केंद्रीय मंत्री प्रह्लाद जोशी आणि आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचे महासंचालक आशिष खन्ना यांनी लिहिलेला लेख, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले.
सौर ऊर्जा ही एक परिवर्तनकारी शक्ती म्हणून उदयास येत आहे यावर हा लेख प्रकाश टाकतो. कृषीसाठी स्वच्छ ऊर्जेचा वापर करण्याचे भारताचे प्रारूप आफ्रिकेसाठी एक विस्तारक्षम प्रारूप आहे, जे सामुहिक समृद्धी मजबूत करते, समुदायांना सक्षम करते आणि अन्न सुरक्षेला प्रोत्साहन देते असे लेखात नमूद केले आहे.ही कामगिरी, भारतातील शेतकरी आणि संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब असल्याचा या लेखात विशेष उल्लेख करण्यात आला आहे.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे :
"सौर ऊर्जा ही एक परिवर्तनकारी शक्ती म्हणून उदयास येत आहे. भारतात वापरण्यात येणारे, कृषी क्षेत्रासाठी स्वच्छ उर्जेचा वापर करण्याचं प्रारूप, आफ्रिकेसाठीदेखील तितकेच प्रभावी ठरते, ज्यामुळे सामुहिक समृद्धी अधिक मजबूत होऊन, समुदायांचं सशक्तीकरण होत, अन्न सुरक्षेची हमी मिळते. खरोखरच आपल्यासाठी आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे !"
केंद्रीय मंत्री प्रह्लाद जोशी आणि आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचे महासंचालक आशिष खन्ना यांनी लिहिलेला हा अभ्यासपूर्ण लेख वाचा.
* * *
नाना मेश्राम/सविता म्हस्कर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2273962)
आगंतुक पटल : 17