पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फ्रांसमध्ये जी-7 शिखर परिषदेत,"नव्या भागीदाऱ्यांची निर्मिती आणि आंतरराष्ट्रीय एकात्मतेची पुनर्बांधणी" या विषयावर भाषण

प्रविष्टि तिथि: 16 JUN 2026 11:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 जून 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रांसच्या इव्हीयान इथे, ‘नव्या भागीदाऱ्यांची निर्मिती आणि आंतरराष्ट्रीय एकात्मतेची पुनर्बांधणी” या विषयावर आयोजित जनसंपर्क सत्रात भाषण केले.

आजच्या परस्परांशी जोडलेल्या जगात, जिथे ऊर्जा, अन्न, आरोग्य, सायबर आणि वित्तीय सुरक्षा असे सगळे विषय एकमेकांशी जोडलेले आहेत, अशा काळात, आंतरराष्ट्रीय भागीदाऱ्या उभ्या करणे, मानवतेची प्रगती आणि समृद्धीसाठी एक गरज बनली आहे, असे मत, पंतप्रधानांनी या भाषणात मांडले. आजच्या अनिश्चित जगात, व्यापार आणि तंत्रज्ञानाचा, काही जण स्वार्थासाठी, गैरवापर करतात, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय पटलावर आविश्वासाचे वातावरण निर्माण होते, असेही ते पुढे म्हणाले. या पार्श्वभूमीवर, कोविड महामारीच्या काळापासून धडा घेत, सर्व देशांनी, परस्पर विश्वास वाढवणे आणि जागतिक भागीदारीत पारदर्शकता आणण्यावर भर द्यायला हवा, असे त्यांनी अधोरेखित केले.

आंतरराष्ट्रीय सहकार्याबाबत भारताचा दृष्टिकोन सामाईक करत, ते म्हणाले की भारताने कायमच ‘मानवता प्रथम’ या तत्वाचे पालन केले असून हाच विचार आपल्या सर्व प्रयत्नांच्या केंद्रस्थानी असतो. मग ते आंतरराष्ट्रीय सौर सहकार्य असो, किंवा आपत्तीचा सामना करु शकणाऱ्या पायाभूत सुविधांची उभारणी  करण्याचे सहकार्य असो, मिशन लाईफ असो किंवा मग एक पेड़ माँ के नाम अभियान असो, यातून हेच तत्व दिसते आहे.

श्रीलंकेतील चक्रीवादळ असो, अफगाणिस्तानमधील भूकंप असो, मोझांबिकमधील पूर असो किंवा जमैकामधील वादळ असो, जगभरात कोणत्याही ठिकाणी नैसर्गिक आपत्तींचे संकट ओढावले, त्या त्या वेळी असाच सर्वसमावेशक दृष्टिकोन बाळगत भारत सदैव सर्वप्रथम प्रतिसाद देणारा देश म्हणूनच पुढे आला असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.

देशाच्या सर्वसमावेशक आणि शाश्वत प्रगतीची सविस्तर मांडणीही पंतप्रधानांनी केली. सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय हाच देशाचा मुख्य मंत्र राहिला आहे, असे त्यांनी सांगितले. या मंत्रामुळेच वित्तीय समावेशन, आरोग्य सुरक्षा, डिजिटल ओळख, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांचे सक्षमीकरण आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या बाबतीत उल्लेखनीय प्रगती साध्य करता आली असल्याचे त्यांनी नमूद केले.

आंतरराष्ट्रीय भागीदारीचे स्वरुप निव्वळ मदत देणारा आणि मदत घेणारा ही पारंपरिक चौकट ओलांडून, परस्परांसोबत ठाम उभे राहण्याच्या आणि समान मालकी हक्काच्या भावनेवर आधारित असावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय कायद्यांबद्दल आदर नसणे हा आंतरराष्ट्रीय एकता उभारणीतील  सर्वात मोठा अडथळा आहे, आणि या समस्येचे प्राधान्याने निराकरण करण्याची गरज आहे, असे त्यांनी त्यांनी नमूद केली. शांतता आणि स्थैर्याची सुनिश्चिती करण्याकरता आंतरराष्ट्रीय भागीदारीत संवाद आणि राजनैतिक मुत्सद्देगिरीला प्राधान्य देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

शैलेश पाटील/सोनाली काकडे/राधिका अघोर/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2273816) आगंतुक पटल : 25
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Telugu , Kannada , Malayalam