आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे औषधे नियम, 1945 मध्ये सुधारणा लहान गावांमध्ये कफ सिरपच्या विक्रीवरील नियमांमधील सूट रद्द
खोकल्याच्या औषधांवरील नियामक नियंत्रण वाढवण्यासाठी औषध नियमांमध्ये महत्त्वाची दुरुस्ती अधिसूचित करण्यात आली
प्रविष्टि तिथि:
16 JUN 2026 2:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जून 2026
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने औषधे नियम, 1945 मध्ये सुधारणा अधिसूचित केली आहे. ही अधिसूचना 'गॅझेट ऑफ इंडिया एक्स्ट्राऑर्डिनरी' भाग दुसरा, विभाग 3, उप-विभाग (i), मध्ये 30 डिसेंबर 2025 रोजी प्रकाशित झालेल्या जी.एस.आर. 927 (ई) या राजपत्र अधिसूचनेद्वारे 29 डिसेंबर 2025 रोजी जारी करण्यात आली असून, त्याद्वारे ‘औषधांचा वर्ग’ (Class of Drugs) या शीर्षकाखालील अनुसूची 'के' अनुक्रमांक 13, नोंद 7 मधून "Syrup" सिरप (Syrup) हा शब्द वगळण्यात आला आहे.
औषधे नियम, 1945 च्या अनुसूची के मध्ये औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, 1940 च्या काही तरतुदी आणि त्याअंतर्गत विशिष्ट श्रेणीतील औषधांसाठी नियमांना सूट देण्यात आली आहे. या सुधारणेपूर्वी, अनुसूची 'के' मधील नोंद क्रमांक 13 अन्वये, 1,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये किरकोळ विक्रीच्या परवान्याशी संबंधित काही तरतुदींचे पालन न करताही कफ सिरपची (खोकल्यावरील औषध) विक्री करायला परवानगी होती.
या नोंदीतून "सिरप" हा शब्द वगळल्यामुळे, यापुढे कफ सिरपसाठी ही सूट लागू होणार नाही. परिणामी, छोट्या गावांमध्ये कफ सिरपची विक्री आणि वितरण आता केवळ औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, 1940 आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या नियमांच्या तरतुदींनुसार केवळ परवानाधारक औषधविक्रेत्यांमार्फतच करणे आवश्यक असेल.
सिरपच्या मिश्रणांवरील नियामक देखरेख अधिक बळकट करण्यासाठी आणि सवलतींची चौकट सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेच्या सध्याच्या आवश्यकतांशी सुसंगत करण्यासाठी ही सुधारणा करण्यात आली आहे. या उपाययोजनेमुळे देशभरात नियामक मानकांचे अधिक काटेकोर पालन सुनिश्चित करण्याबरोबरच, कफ सिरपचे जबाबदार वितरण आणि विक्रीला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.
कफ सिरपशी संबंधित उत्पादक, वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांनी औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, 1940 आणि औषधे नियम, 1945 अंतर्गत लागू परवाना आणि नियामक आवश्यकतांचे काटेकोरपणे पालन सुनिश्चित करावे, असे सूचित करण्यात आले आहे.
ई-गॅझेट अधिसूचना येथे पाहता येईल: https://egazette.gov.in/WriteReadData/2026/273467.pdf
* * *
नाना मेश्राम/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2273516)
आगंतुक पटल : 36
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada