युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते विकसित भारत युवा संसद 2026 चे उद्या उद्घाटन

Posted On: 15 JUN 2026 3:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जून 2026

केंद्रीय युवा कार्यक्रम आणि  क्रीडा तसेच कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्ली येथे 15 ते 17 जून 2026 या कालावधीत ‘विकसित भारत युवा संसद 2026' चे आयोजन करण्यात आले आहे.युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्‍यात आलेल्या या  राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे 16 जून 2026 रोजी संसद  लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते विकसित भारत युवा संसद उद्घाटन होणार आहे.

यंदा युवा वर्गाचा सहभाग अधिक दृढ करण्याच्या अनुषंगाने या कार्यक्रमाच्या आयोजनाची विभागणी तीन प्रगतीशील टप्प्यांच्या स्वरुपात केली गेली आहे.   

जिल्हा समन्वय फेऱ्या

· आणीबाणीची 50 वर्षे या विषयावर व्यापक चर्चा: भारतीय लोकशाहीला मिळालेली शिकवण या विषयावर देशभरातील 757 समन्वयक विद्यापीठे आणि संस्थांमध्ये व्यापक चर्चा करण्यात आल्या. या माध्यमातून हा संवाद देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात आला.

· प्रत्येक जिल्ह्यामधील सवोत्कृष्ट 5 सहभागींना राज्य पातळीवरील टप्प्यात भाग घेण्याची संधी मिळाली.

राज्य पातळीवरील फेऱ्या

· सर्व राज्यांमधील विधानसभा आणि प्रमुख सरकारी ठिकाणांवर हे टप्पे आयोजित करण्यात आले होते.  या टप्प्यांमधून युवा वर्गाला  ‘केंद्रीय अर्थसंकल्प 2026: युवा शक्तीने प्रेरित अर्थसंकल्प’  या विषयाला अनुसरुन प्रादेशिक प्रशासकीय व्यवस्थेबद्दल अर्थपूर्णरितीने झलक सादर करण्‍यात आली.  

· याअंतर्गत  राज्यांचे विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या या सत्रांनी सार्वजनिक चर्चांमधील युवा वर्गाच्या अभिव्यक्तीचे महत्व अधिक वाढले.

राष्ट्रीय फेरी (15-17 जून, 2026):

· सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील उत्कृष्ट कामगिरी करणारे प्रतिनिधी भव्य अंतिम फेरीसाठी नवी दिल्लीत एकत्र येतील.

राष्ट्रीय फेरीत विविध उपक्रमांचा समावेश आहे:

· उद्घाटनपर भाषण: प्रत्येक संघातील एक प्रतिनिधी 'नारी शक्ती वंदन: सर्वसमावेशकतेला चालना' आणि 'विकसित भारत 2047' या विषयांवर सभागृहाला संबोधित करेल.

·  प्रश्नोत्तरांचा तास: खऱ्या संसदीय परंपरेनुसार प्रत्येक संघ इतर संघांना प्रश्न विचारतील आणि त्यांना उत्तरे देतील. प्रश्न विचारण्यासाठी 3 मिनिटे, उत्तर देण्यासाठी 3 मिनिटे वेळ दिला जाईल. आणि यातून सामूहिक ठराव तयार केला जाईल.

· मास्टरक्लास: एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व वक्तृत्वकला आणि सार्वजनिक भाषणकलेवर एक मास्टरक्लास घेतला जाणार आहे. त्यामुळे सहभागी युवकांचे नेतृत्वकौशल्य अधिक प्रभावी बनेल.
     
· पंतप्रधान संग्रहालय भेट: प्रतिनिधी पंतप्रधान संग्रहालयाच्या विशेष भेटीद्वारे भारताचा समृद्ध राजकीय वारसा आणि नेतृत्वाची परंपरा जाणून घेतील.

· नवीन संसद भवनाला भेट: भारताच्या नवीन संसद भवनाची एक प्रेरणादायी सफर आयोजित केली जाईल जी सहभागींना देशाच्या लोकशाहीच्या केंद्राशी थेट संबंध जोडण्याची संधी प्रदान करेल.

· पुरस्कार सोहळा: 17 जून रोजी 'विकसित भारत युवा संसद 2026' पुरस्कार प्रदान केले जातील. या पुरस्काराद्वारे तरुण सहभागींच्या उत्कृष्ट योगदानाचा गौरव केला जाईल.

 

सुवर्णा बेडेकर/भक्‍ती सोनटक्के/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2273001) अभ्यागत कक्ष : 57