MIFF banner

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाकडून वेव्हज डॉक बाजार 2026 मध्ये प्रदर्शित केल्या जाणाऱ्या ‘वेव्हज डॉक बाजाराची शिफारस’ या श्रेणीतील निवडक प्रकल्पांची घोषणा


वेव्हज डॉक बाजारअंतर्गत 19 देश आणि 35 भाषांमधील आलेल्या 155 जागतिक प्रकल्पांमधून 12 प्रकल्पांची निवड केली आहे.

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या वतीने वेव्हज डॉक बाजार 2026 मध्ये सहभागी होणाऱ्या तीन उत्कृष्ट प्रकल्पांसाठी प्रत्येकी 3 लाख रुपयांच्या रोख अनुदानाचे पाठबळ

 

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (NFDC) 19 व्या मिफ्फ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केल्या जाणार असलेल्या वेव्हज डॉक बाजारच्या दुसऱ्या आवृत्तीसाठी, वेव्हज डॉक बाजार शिफारस कार्यक्रमाअंतर्गत  निवडक प्रकल्पांची घोषणा केली आहे.

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या मुंबईतील डॉ. गोपाळराव देशमुख मार्ग इथल्या मुख्य कार्यालयात 16 ते 18 जून 2026 या कालावधीत मिफ्फच्या या व्यापार व्यवसाय विषयक विभागाचे आयोजन केले जाईल. या आयोजनाच्या निमित्ताने माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन क्षेत्रातील चित्रपटकर्ते, निर्माते, प्रसारक, वितरक, महोत्सव नियोजक आणि या उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक तज्ञ एकत्र येतील.

वेव्हज डॉक बाजार अंतर्गत व्ह्युइंग रूम (प्रदर्शन दालन), वर्क-इन-प्रोग्रेस (WIP) लॅब (चालू प्रकल्पांसंबंधीचे माहिती दालन) आणि संबंधित उद्योग - व्यावसायिकांच्या प्रत्यक्ष बैठका यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून सहकार्यपूर्ण प्रकल्प, संपर्काचा विस्तार आणि या क्षेत्राशी संबंधित बाजारपेठेतील संधी वाढवण्याच्या उद्देशाने या उद्योग क्षेत्रासाठी उपलब्ध करून दिलेला एक मंच आहे.

उदयोन्मुख प्रतिभांना पाठबळ देण्यासाठी तसेच प्रभावी कथात्मक मांडणीला देण्यासाठी राबवल्या जात असलेल्या या महत्त्वाच्या उपक्रमांतर्गत, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने वेव्हज डॉक बाजार 2026 मध्ये सहभागी होणाऱ्या तीन उत्कृष्ट प्रकल्पांसाठी प्रत्येकी 3 लाख रुपयांचे रोख अनुदानही सुरू केले आहे. या अनुदानामुळे अपवादात्मक कल्पकता, प्रभावी कथा, दृढ कलात्मक मूल्य आणि भारतातील तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील प्रेक्षकांना आकर्षित करण्याची क्षमता असलेल्या प्रकल्पांची दखल घेतली जाईल.

वेव्हज डॉक बाजार रेकमेंड्स अंतर्गत 12 प्रकल्पांची निवड केली गेली आहे. यात वर्क-इन-प्रोग्रेस लॅबमध्ये सहभागी होणार असलेल्या चार प्रकल्पांचाही समावेश आहे. या लॅबच्या माध्यमातून, निवड झालेल्या चित्रपटकर्त्यांना प्रतिष्ठित निमंत्रित आंतरराष्ट्रीय सल्लागार आणि संपादकांना प्राथमिक स्वरुपात संपादित केलेले आपले चित्रपट दाखवता येणार आहेत. या माध्यमातून त्यांना त्यांचे प्रकल्प सक्षम करण्यासाठी तसेच उद्योग क्षेत्रासोबत व्यापक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आणि वितरणाच्या संधींसाठी निर्माण करण्यासाठी मौलिक अभिप्राय, मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल.

वेव्हज डॉक बाजार रेकमेंड्स श्रेणी अंतर्गत आणखी आठ प्रकल्पांची निवडही करण्यात आली आहे. हे चित्रपट पूर्ण झालेले आहेत किंवा निर्मितीनंतरच्या टप्प्यात असून ते विक्री, वितरण आणि प्रदर्शनाच्या संधीच्या शोधात असलेले प्रकल्प आहेत. या उपक्रमाअंतर्गत चित्रपटकर्त्यांना या क्षेत्राशी संबंधित बाजारपेठेत पाऊल टाकणे तसेच व्यापक पातळीवर प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याच्या पर्यायांची  चाचपणी करण्यासाठी खरेदीदार, वितरक, प्रसारक, प्रसारण मंच आणि या उद्योग क्षेत्रातील इतर संबंधित भागधारकांसोबत संवाद साधण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.

निवडण्यात आलेले सर्व 12 प्रकल्प 16 जून 2026 रोजी बाजारच्या उद्घाटनाच्या दिवशी आयोजित करण्यात येणाऱ्या खुल्या प्रकल्प सादरीकरण सत्रात सहभागी होतील. या सत्रामध्ये चित्रपट निर्मात्यांना खरेदीदार, वितरक, प्रसारक आणि चित्रपट महोत्सवांचे प्रतिनिधी यांसह विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांसमोर आपले प्रकल्प सादर करण्याची संधी मिळेल. तसेच, या माध्यमातून सहभागी आपल्या चित्रपटांची वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना मांडू शकतील आणि अर्थपूर्ण भागीदारी तसेच सहकार्याची नाती निर्माण करू शकतील.

वेव्हज (माहितीपट बाजाराच्या दुसऱ्या आवृत्तीतील एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे ‘अवलोकन कक्ष’. हा एक समर्पित डिजिटल ग्रंथालय विचार मंच  असून, त्याद्वारे चित्रपट निर्माते आपल्या कलाकृती उद्योग क्षेत्रातील संबंधित घटकांसमोर सादर करू शकतात. त्यामुळे संपर्कजाळे निर्माण करणे, वितरण आणि सामग्री संपादनाच्या संधींना चालना मिळते.

या वर्षीच्या अवलोकन कक्षामध्ये 19 देशांतील 35 भाषांमधील 155 प्रकल्पांचा समावेश असेल. यामुळे खरेदीदार, प्रसारक, वितरक, चित्रपट महोत्सव कार्यक्रम नियोजक आणि इतर उद्योग क्षेत्रातील घटकांना जगभरातील माहितीपटांच्या विविध कथनशैली आणि दृष्टिकोनांचा समृद्ध अनुभव घेण्याची संधी मिळेल.

कार्यप्रगती प्रयोगशाळा 2026 साठी निवडलेले चित्रपट

‘अदिऊ दिल्ली’ – दिग्दर्शक : नंदन सक्सेना आणि कविता बहल

‘इट टेक्स अ व्हिलेज’ – दिग्दर्शक : इंद्रजीत मोरे

‘कुंचोक अँड हिज मेनी मून्स’ – दिग्दर्शक : अशोक मीणा

‘ऑन अ गुड नोट’ – दिग्दर्शक : करिश्मा राव

वेव्हज माहितीपट बाजार शिफारस 2026 साठी निवडलेले चित्रपट

‘बाय द होम’ – दिग्दर्शक : मंकाप नोक्वोहाम

‘दो चार दिन’ – दिग्दर्शक : सान्या आनंद

‘एचे’ – दिग्दर्शक : डिंगकू थिंगनाम

‘रसनिष्पथी’ – दिग्दर्शक : हरीश के. एम.

‘राईज’ – दिग्दर्शक : अरस्तू झाकिया

‘द गर्ल बिनीथ द सन’ – दिग्दर्शक : मधुरिमा मैती

‘तुरू’ – दिग्दर्शक : रामेश्वर भट्ट

‘टुक्रो टुक्रो पृथिबी’ – दिग्दर्शक : अस्मिता पाल

निवडलेल्या प्रकल्पांमधून समकालीन माहितीपट निर्मितीतील विविधता, सर्जनशीलता आणि सामर्थ्य अधोरेखित होते. तसेच, उदयोन्मुख प्रतिभांना प्रोत्साहन देणे आणि चित्रपट निर्मात्यांना जागतिक बाजारपेठ व प्रेक्षकांशी जोडण्यासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून देण्याच्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (एनएफडीसी) वचनबद्धतेलाही ते अधोरेखित करतात.

***

शैलेश पाटील/तुषार पवार/नितीन गायकवाड/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #MIFF2026. Tag us @pibmumbai on X, and we'll help spread your passion! For journalists, bloggers, and vloggers wanting to connect with filmmakers for interviews/interactions, reach out to us at miff.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


रिलीज़ आईडी: 2272686   |   Visitor Counter: 46