संरक्षण मंत्रालय
संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेकडून देशाच्या अत्याधुनिक संरक्षण क्षमतांचे प्रात्यक्षिक सादर
प्रविष्टि तिथि:
13 JUN 2026 7:06AM by PIB Mumbai
संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने शत्रूकडून असणाऱ्या विविध प्रकारच्या धोक्यांविरुद्ध देशाच्या संरक्षण क्षमतांना बळकटी देणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानांचे यशस्वी प्रात्यक्षिक सादर केले. 10 आणि 11 जून 2026 रोजी सलग तीन उड्डाण-चाचण्या करण्यात आल्या असून, दीर्घ पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण क्षमता तसेच मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षमता प्रदर्शित करण्यात आली.
बहुस्तरीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण क्षमता यशस्वीपणे दाखवण्यात आली. अवरोधक क्षेपणास्त्रांनी आपापली लक्ष्ये यशस्वीरीत्या भेदली. उदयोन्मुख क्षेपणास्त्र धोक्यांना तोंड देण्यासाठी या प्रणाली अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आल्या आहेत.
या चाचण्यांमुळे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपर्यंत लक्ष्य भेदण्याची क्षमता असलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली असणाऱ्या निवडक देशांच्या गटात भारताचा समावेश झाला आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणीही यशस्वीपणे पार पडली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था तसेच संरक्षण दलातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
या महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानांचे यशस्वी प्रात्यक्षिक सादर केल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचे अभिनंदन केले आहे. संरक्षण संशोधन व विकास विभागाचे सचिव तथा डीआरडीओचे अध्यक्ष राजेश कुमार सिंह यांनी या चाचण्यांचे प्रत्यक्ष निरीक्षण केले आणि डीआरडीओ व उद्योग क्षेत्राच्या संयुक्त प्रयत्नांचे कौतुक केले.
(1)4UAR.jpeg)
28U6.jpeg)
(1)HT2H.jpeg)
N25A.jpeg)
***
माधुरी पांगे/राज दळेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2272503)
आगंतुक पटल : 14