माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव डॉ.टी.व्ही.सोमनाथन् यांनी नीट फेरपरीक्षा तयारीचा राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या महासंचालकांसोबत घेतला आढावा

प्रविष्टि तिथि: 12 JUN 2026 7:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जून 2026

केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव डॉ. टी. व्ही. सोमनाथन् यांनी आज नीट फेरपरीक्षा तयारीचा राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या महासंचालकांसोबत एका बैठकीत आढावा घेतला.

या आढावा बैठकीदरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांनी सर्व संबंधित घटकांमध्ये जवळचा समन्वय ठेवून फेरपरीक्षा सुरळीत, पारदर्शक आणि सुरक्षितपणे पार पाडण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. नीट फेरपरीक्षा 21 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे.

“नीट  फेरपरीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि जिल्हा प्रशासन एकमेकांशी जवळचा समन्वय ठेवून एकत्र काम करत आहेत. या फेरपरीक्षेच्या अखंडतेत किंवा सुरळीत प्रक्रियेत कोणत्याही प्रकारे अडथळा आणण्याचा, ती विस्कळीत करण्याचा किंवा त्यात फेरफार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर कायद्याचा पूर्ण बडगा उगारला जाईल,” असा इशारा केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांनी दिला.

सोमनाथन यांनी 1 जून 2026 रोजी केंद्र सरकारचे सचिव आणि संबंधित संस्थांसोबत व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर, 4 जून 2026 रोजी त्यांनी तयारी आणि व्यवस्थेच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य सरकारांच्या मुख्य सचिवांसोबतही एक आढावा बैठक घेतली.

प्रभावी समन्वय सुनिश्चित करणे, तयारी मजबूत करणे आणि नीट  फेरपरीक्षा प्रक्रियेची अखंडता व विश्वासार्हता राखणे हा या बैठकांचा उद्देश आहे.


सुषमा काणे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2272318) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Khasi , Urdu , हिन्दी , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Kannada , Malayalam