गृह मंत्रालय
पद्म पुरस्कार-2027 साठी नामांकने पाठवण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026
Posted On:
05 JUN 2026 5:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जून 2026
प्रजासत्ताक दिन, 2027 च्या निमित्ताने जाहीर करण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कार-2027 साठी नामांकने/शिफारशी सादर करण्याची प्रक्रिया 15 मार्च 2026 रोजी सुरू झाली आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकने पाठवण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकन/शिफारशी केवळ राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने स्वीकारल्या जातील (https://awards.gov.in).
पद्म पुरस्कार, म्हणजे, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री, हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत. 1954 मध्ये सुरू करण्यात आलेले हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने घोषित केले जातात. हे पुरस्कार उत्कृष्ट कामगिरीची दखल घेण्यासाठी प्रदान केले जातात. तसेच कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यकशास्त्र, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग यासारख्या सर्व क्षेत्रांमधील उल्लेखनीय आणि अपवादात्मक कामगिरी अथवा सेवेसाठी ते दिले जातात. वंश, व्यवसाय, पद अथवा लिंग असा कोणताही भेदभाव न करता सर्व व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहेत. डॉक्टर आणि शास्त्रज्ञ वगळता, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधील कर्मचाऱ्यांसह इतर सरकारी कर्मचारी पद्म पुरस्कारांसाठी पात्र नाहीत.
पद्म पुरस्कारांचे ‘जनतेचे पद्म’ मध्ये रुपांतर करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी स्वतःच्या नामांकनासह इतर व्यक्तींसाठी नामांकने/शिफारशी सादर कराव्यात. महिला, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, दिव्यांग व्यक्ती आणि समाजाची निःस्वार्थ सेवा करणाऱ्या प्रतिभावान व्यक्तींच्या कामगिरीची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करता येतील.
नामांकन/शिफारस करताना, वर नमूद केलेल्या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या नमुन्यानुसार सर्व संबंधित तपशील भरणे आवश्यक आहे, यात संबंधित व्यक्तीने आपल्या क्षेत्रात/शाखेत केलेली उल्लेखनीय आणि अपवादात्मक कामगिरी/सेवा, याचा स्पष्ट आणि सविस्तर उल्लेख असावा.
याबाबतचे तपशील गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावर (https://mha.gov.in) आणि पद्म पुरस्कार पोर्टलवर (https://padmaawards.gov.in) 'Awards and Medals' (पुरस्कार आणि पदके) या शीर्षकाखाली देखील उपलब्ध आहेत. या पुरस्कारांशी संबंधित नियम आणि अटी संकेतस्थळावर पुढील लिंकवर उपलब्ध आहेत: https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx.
* * *
राधिका अघोर/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2269358)
अभ्यागत कक्ष : 355
Read this releasein:
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam