गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली शिलाँग येथे ईशान्य परिषदेच्या 73 व्या पूर्ण सत्राचे आयोजन
Posted On:
04 JUN 2026 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जून 2026
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी मेघालयाची राजधानी शिलाँग येथे नॉर्थ ईस्टर्न कौन्सिलच्या म्हणजेच ईशान्य परिषदेच्या 73 व्या पूर्ण सत्राचे अध्यक्षस्थान भूषवले.
सभेला संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, या काळात घातलेल्या भक्कम पायावर आता एका विकसित ईशान्य भारताची उभारणी होत आहे आणि गेल्या 12 वर्षांत या प्रदेशातील सर्व राज्यांमध्ये लक्षणीय गुणात्मक परिवर्तन झाले आहे. शाह म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त, ईशान्य भारताच्या विकासासाठी इतक्या सातत्यपूर्ण एकाग्रतेने आणि वचनबद्धतेने काम करणारे दुसरे कोणतेही पंतप्रधान कदाचित झाले नाहीत.
त्यांनी नमूद केले की, गेल्या 12 वर्षांत ईशान्य भारतातील विविध संघर्ष सोडवण्यासाठी 12 हून अधिक शांतता करार झाले असून 10,800 हून अधिक तरुणांना शस्त्रे खाली ठेवल्यानंतर मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहे. शाह यांनी सांगितले की, मोदी सरकारने ईशान्य भारताला बंडखोरीच्या विळख्यातून मुक्त केले आहे.
ते म्हणाले की गेल्या 12 वर्षांत ईशान्य भारताची विविधता जगासमोर एक मोठी ताकद म्हणून उदयास आली आहे. शाह म्हणाले की, आज संपूर्ण जग ईशान्य भारताला संधींचे केंद्र म्हणून ओळखते.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, ईशान्य भारताचा विकास, समृद्धी आणि सांस्कृतिक अस्मितेचे जतन यावरील उच्चस्तरीय कृती दलाचा महत्त्वाचा अहवाल हा एखाद्या मार्गदर्शक धर्मग्रंथासारखा आहे. त्यांनी राज्यांना विविध निकषांनुसार उपलब्ध असलेल्या सर्व अर्थसंकल्पीय तरतुदींचा वापर करण्याचे आणि अहवालातील शिफारशींची 100 टक्के अंमलबजावणी करण्याच्या दिशेने काम करण्याचे आवाहन केले. ईशान्य भारताचे भविष्यातील प्राधान्यक्रम आता या अहवालाच्या आधारावर निश्चित केले पाहिजेत, यावर त्यांनी भर दिला.




* * *
सुवर्णा बेडेकर/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2269093)
अभ्यागत कक्ष : 74