भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

निवडणूक प्रक्रियेतील माध्यमांसाठी जागतिक सर्वोत्तम कार्यपद्धतींवर निवडणूक आयोगाच्या वतीने आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

प्रविष्टि तिथि: 03 JUN 2026 8:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जून 2026

भारत निवडणूक आयोगाच्या वतीने नवी दिल्लीतील भारतीय आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन संस्थेत (IIIDEM - India International Institute of Democracy and Election Management) आज  आणि उद्या म्हणजे 4 जून 2026 रोजी 'निवडणूक प्रक्रिया आणि मोहिमांधील माध्यमांसाठीच्या जागतिक सर्वोत्तम कार्यपद्धती आणि नवोन्मेषी उपक्रम या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

आज या परिषदेच्या पहिल्या दिवशी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी उपस्थितांना संबोधित केले. भारत निवडणूक आयोग 100 कोटींहून अधिक मतदारांशी अविरत संपर्काची सुनिश्चिती करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी  आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रतिनिधी  यांच्यासह तळागाळातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. नुकत्याच पार पडलेल्या काही राज्यांच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमधील मतदारांच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च सहभागातून निवडणूक प्रक्रियेवरील त्यांचा विश्वास दिसून आला, असेही त्यांनी नमूद केले.

या परिषदेमध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी , निवडणूक नोंदणी अधिकारी, विषयतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि निवडणूक साक्षरता मंडळाच्या  सदस्यांसह 480 पेक्षा प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

भारत आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन परिषदेमध्ये, 23 जानेवारी 2026 रोजी स्वीकारण्यात आलेल्या दिल्ली जाहिरनाम्याअंतर्गत  प्रस्तावित अंतिम अहवालात योगदान देण्याच्या उद्देशाने ही परिषद आयोजित केली गेली आहे. निवडणूक व्यवस्थापनाच्या विविध पैलूंशी संबंधित आंतरराष्ट्रीय अनुभव, आदर्श मानके आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींचे दस्तऐवजीकरण करणारी तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल अशी जागतिक ज्ञान संसाधने विकसित करणे हा या परिषदेचा मुख्य हेतू आहे.

या परिषदेतील चर्चा या प्रामुख्याने माध्यम जगतातील मोहिमांमधील महत्त्वाच्या आव्हानांवर केंद्रित आहेत. याअंतर्गत चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोगाने तयार केलेले डीपफेक साहित्य, सिंथेटिक मीडिया, पारदर्शकतेचा अभाव असलेल्या डिजिटल राजकीय जाहिराती आणि समाज माध्यम व्यासपीठांचे नियमन यांसारख्या प्रमुख मुद्द्यांचा समावेश आहे.

इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमॉक्रसी अँड इलेक्टोरल असिस्टन्स (International IDEA) या संस्थेचे 2026 चे अध्यक्षपद भारताकडे आहे. त्याअंतर्गतच  या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने भारतीय आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन संस्था आणि दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सहकार्याने संयुक्तपणे या परिषदेचे आयोजन केले आहे.


सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2268636) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Urdu , English , हिन्दी , Bengali , Gujarati , Tamil , Malayalam