महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 साठी नामांकन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026

प्रविष्टि तिथि: 02 JUN 2026 6:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 जून 2026

 

केंद्र  सरकारने 'प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026' साठी नामांकने पाठवण्याचे आवाहन केले आहे. अत्यंत प्रतिष्ठेचा गणला जाणारा हा पुरस्कार विविध क्षेत्रांत असाधारण कर्तृत्व गाजवणाऱ्या बालकांना, राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केला जातो. या पुरस्कारासाठी  नामांकन सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 आहे.

नामांकने केवळ 'राष्ट्रीय पुरस्कार' या अधिकृत पोर्टलद्वारे (https://awards.gov.in) ऑनलाईन सादर करता येतील.

31 जुलै 2026 रोजी, 5 ते 18 वयोगटातील बालके या पुरस्कारासाठी पात्र आहेत. या पुरस्कारासाठी कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेद्वारे नामांकन सादर करता येऊ शकते; तसंच बालके स्वतः देखील स्वतःचे नामांकन करू शकतात.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) सहा श्रेणींमध्ये प्रदान केला जातो :

  • साहस
  • समाजसेवा
  • पर्यावरण
  • क्रीडा
  • कला आणि संस्कृती
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान

अर्ज करण्यासाठी https://awards.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी अथवा लॉगइन करणे आवश्यक असून, अर्जदाराचे नाव, जन्मतारीख, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी इत्यादी आवश्यक माहिती पुरवावी लागते. कृपया, 'सध्या सुरु असलेल्या नामांकने' विभागाअंतर्गत (Ongoing Nominations section), 'प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026' हा पर्याय निवडावा आणि त्यात  Nominate/Apply Now वर क्लिक करावे आणि संबंधित पुरस्कार श्रेणी निवडून, नामांकन स्वतःसाठी आहे की अन्य बालकासाठी आहे हे नमूद करावे.

अर्जामध्ये नामनिर्देशित व्यक्तीचे तपशील, त्याची कामगिरी आणि त्या कामगिरीचा पडलेला प्रभाव  याबाबतचे लिखाण (1000 शब्दमर्यादा), पूरक कागदपत्रे आणि अलीकडील छायाचित्र (jpg/jpeg/png) यांचा समावेश असणे आवश्यक आहे.

याबाबतच्या, तपशीलवार आणि प्रत्येक टप्प्यावरील सूचना पीएमआरबीपी 2026 संकेतस्थळातील पृष्ठावर, 'अधिसूचना' (‘Notification’) टॅब अंतर्गत "प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार योजनेसाठी नोंदणी आणि नामांकन प्रक्रिया" याअंतर्गत उपलब्ध आहेत.

अर्ज ड्राफ्ट म्हणून जतन करून ठेवता येतील आणि  अंतिम सादरीकरण्यापूर्वी त्यांचं संपादन केलं जाऊ शकतं. अर्ज अंतिमरीत्या सादर केल्यानंतर, नोंदी साठी त्याची डाऊनलोड करण्यायोग्य प्रत तयार होते.

कर्तबगार बालकांना राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करणारा असा हा जीवनसार्थक पुरस्कार आहे. सविस्तर मार्गदर्शक तत्वे आणि या पुरस्काराच्या  मागील विजेत्यांच्या माहितीसाठी खालील संकेतस्थळांना भेट द्या :

या पुरस्कारासाठी पात्र मुलांना अर्ज भरण्यासाठी किंवा त्यांचे नामांकन करण्यासाठी सहाय्य करावे असे आवाहन सर्व पालक, शिक्षक, संघटना आणि नागरिकांना मंत्रालयातर्फे करण्यात येत आहे.

पत्र सूचना कार्यालयाकडून या संबंधित प्रसारित करण्यात आलेल्या बातमीसाठी पुढील संकेतस्थळाला भेट द्या :

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2255800®=3&lang=2

 

* * *

निलिमा चितळे/सविता म्‍हस्कर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2268087) आगंतुक पटल : 31
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Gujarati , Tamil , Kannada , Malayalam