उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन 29 ते 31 मे या कालावधीत कर्नाटक, गोवा आणि केरळला भेट देणार

Posted On: 28 MAY 2026 8:26PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 मे 2026

 

उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन 29 ते 31 मे 2026 या कालावधीत कर्नाटक, गोवा आणि केरळ या राज्यांच्या तीन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत.

उपराष्ट्रपती दिनांक 29 मे रोजी कर्नाटकात बेंगळूरू येथे आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनच्या 45 व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित जागतिक सोहोळ्यात उपस्थित राहतील. त्यानंतर, दिवसभरात ते कर्नाटकात दावणगेरे येथील युनिव्हार्सिटी बीडीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवी सोहोळ्यामध्ये सहभागी होतील.

दिनांक 30 मे रोजी उपराष्ट्रपती पणजी येथे आयोजित गोवा राज्यस्थापना दिन सोहोळ्यात सहभागी होतील. त्यादिवशी नंतर ते गोव्यातील सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेला भेट देतील.

दिनांक 31 मे रोजी उपराष्ट्रपती श्री क्षेत्र धर्मस्थळ मंजुनाथ स्वामी मंदिराला भेट देतील. त्यानंतर ते कर्नाटकात, बेल्थंगडी येथील SIRI औद्योगिक पार्कचे उद्घाटन करतील.

त्यानंतर, उपराष्ट्रपती केरळला जातील. केरळमध्ये कोट्टायम येथे दीपिका मल्याळम या वृत्तपत्राच्या स्थापनेच्या 140व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित सोहोळ्याचे ते उद्घाटन करतील. या केरळ भेटीदरम्यान, राज्यसभा सदस्य सी.सदानंदन मास्टर यांनी आयोजित केलेल्या खासगी समारंभामध्ये सहभागी होण्यासाठी उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन कन्नूरला देखील भेट देतील.

 

* * *

सोनाली काकडे/संजना चिटणीस/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2266403) अभ्यागत कक्ष : 17