पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
ग्राहकांना पाईपद्वारे मिळणाऱ्या नैसर्गिक वायू इंधन जोडणीचा पर्याय निवडणे सुलभ व्हावे यासाठी केंद्र सरकारने एलपीजी नियंत्रण आदेशातील दुरुस्तीबाबतची अधिसूचना केली जारी
पाईपद्वारे पुरवठा केल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायू इंधनाची अर्थात पीएनजीची जोडणी असलेल्या एलपीजी ग्राहकांना भविष्यात पीएनजी नसलेल्या भागात गेल्यावर, एलपीजीची जोडणी पुन्हा सुरू करण्यासाठी ट्रान्सफर व्हाउचरचा पर्याय मिळणार
Posted On:
25 MAY 2026 9:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,25 मे 2026
केंद्र सरकारने 25 मे 2026 रोजी द्रवीकृत पेट्रोलियम वायू (पुरवठा आणि वितरण नियमन) दुरुस्ती आदेश 2026 ची अधिसूचना जारी केली आहे. जे ग्राहक पीएनजी कालांतराने पाईपद्वारे पुरवठा केल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायू इंधनाची जोडणी घेतात अशा देशांतर्गत एलपीजी ग्राहकांना अतिरिक्त सवलत आणि सुविधा देणे हा या दुरुस्तीमागचा उद्देश आहे.
सुधारित तरतुदींनुसार, ज्या एलपीजी ग्राहकांकडे पीएनजी जोडणी देखील आहे, त्यांच्यासाठी खालील नमूद पर्याय उपलब्ध असणार आहेत:
1. ग्राहक पीएनजी जोडणी मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत एलपीजी जोडणी रद्द करण्यासाठीचा अर्ज करू शकतात,किंवा
2. ग्राहक भविष्यात पीएनजी सुविधा नसलेल्या भागात, एलपीजीची जोडणी पुन्हा सुरू केली जावी यासाठीचे ट्रान्सफर व्हाउचर अर्थात स्थलांतरणाचे अनुमतीपत्र मिळवू शकतात.
या दुरुस्तीमुळे, जे ग्राहक कालांतराने जिथे पीएनजीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही अशा भागात स्थलांतरित होणार असतील तर अशा ग्राहकांना मोठा दिलासा आणि पर्याय मिळू शकणार आहे.
ही तरतूद विशेषतः बदली होणारे कर्मचारी, स्थलांतरित कुटुंबे, भाडेकरू, विद्यार्थी आणि पीएनजी सुविधा नसलेल्या भागात स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांसाठी लाभदायक ठरणार आहे.
राधिका अघोर/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2265188)
अभ्यागत कक्ष : 14