गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दिल्लीत आयोजित भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंती निमित्त आयोजित 'जनजाती सांस्कृतिक समागम' समारंभाला केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी प्रमुख पाहुणे म्हणून केले संबोधित

Posted On: 24 MAY 2026 10:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 मे 2026

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी दिल्लीत आयोजित 'जनजाती सांस्कृतिक समागम'या भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंती निमित्त आयोजित समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित केले. 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यावेळी बोलताना म्हणाले की, आदिवासी समुदायाचा महाकुंभ म्हणून हे संमेलन अनेक वर्ष स्मरणात राहील. ते म्हणाले की, भगवान बिरसा मुंडा यांच्यानंतर ही पहिलीच आदिवासी चळवळ आहे ज्यामने संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधले आहे. चालू वर्ष हे भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 वी जयंतीचे वर्ष आहे. उलगुलान चळवळीने ब्रिटिशांना झुकवले होते, याची नोंद घेतली आणि संवादाच्या सुविधांची वानवा असताना असूनही भगवान बिरसा मुंडा यांनी झारखंड ते गुजरातपर्यंत आणि संपूर्ण देशात, आपली श्रद्धा ही खरी श्रद्धा आहे आणि आपल्या जंगलांवर कोणीही अतिक्रमण करू शकत नाही, हा संदेश पोहोचवण्यात यश मिळवले. पाणी, जंगले आणि डोंगर ही आम्हा आदिवासी बंधू आणि भगिनींच्या श्रद्धेचे केंद्रबिंदू आहेत, उपजीविकेचे स्रोत आहेत आणि त्यांची ओळख व संस्कृती यांची संरक्षक असलेले अभेद्य दुर्ग आहेत. आजच्या काळातील शाश्वत विकासाचे सर्वांत आदर्श प्रारूप हे आदिवासी समुदायांनीच निर्माण केले आहे असेही आज ते म्हणाले.

सर्व आदिवासी समुदायांनीच विविधतेत एकता आणि एकतेत विविधता या मूल्याचा आदर्श घालून दिला आहे असे शहा म्हणाले. आपल्या संविधानकर्त्यांनी प्रत्येक व्यक्तीला आपल्या श्रद्धेसह सन्मानाने जगण्याचा अधिकार प्रदान केला आहे. कोणीही एखाद्या व्यक्तीला लोभ, प्रलोभन अथवा बळजबरी करून धर्मांतर करण्यासाठी भाग पाडू शकत नाही. ते म्हणाले की, आदिवासी समुदायांनी जर आज आपल्या श्रद्धेच्या रक्षणाचा निर्धार केला तर त्यांची कटिबद्धता आपल्या संस्कृती आणि देशाला जोडून ठेवेल. आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या हे लक्षात येत नाही की हजारो वर्षांपूर्वी प्रभू श्री रामाने शबरीने चाखलेली उष्टी बोरे खाल्ली होती, त्यातून आपण सारे एकच आहोत हा संदेश दिला होता, असेही शहा यांनी नमूद केले. आजचे संमेलन आणि त्यामध्ये लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेला आदिवासी समुदाय, समाजात फूट पाडू इच्छिणाऱ्यांपर्यंत एक खंबीर संदेश पोहोचवतात.

शाह म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी आदिवासी कल्याणाला पुढे नेण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे. मागील केंद्रीय सरकारच्या कार्यकाळात आदिवासी कल्याणासाठी एकूण ₹28,000 कोटींची तरतूद होती, ती पंतप्रधान मोदी यांनी वाढवून ₹1.5 लाख कोटी केली आहे. त्यांनी सांगितले की, मोदी सरकार आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.

अमित शाह पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी गरीब संथाल कुटुंबातून आलेल्या द्रौपदी मुर्मू यांना भारताच्या राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचवून संपूर्ण आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी कार्य केले. ते म्हणाले की, अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात झारखंड आणि छत्तीसगड ही आदिवासी बहुल राज्ये बनली आणि आज ओडिशा तसेच छत्तीसगडमध्ये आदिवासी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी सांगितले की, पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी भारत सरकारने पेसा कक्षाची स्थापना केली असून 1 लाखांहून अधिक मुख्य प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. तसेच पेसा नियमांचे संथाली, गोंडी, भिली आणि मुंडारी यांसारख्या अनेक आदिवासी भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले आहे.

अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 722 एकलव्य आदर्श शाळांसह अनेक मोठ्या विकास योजना राबवल्या असून प्रत्येक आदिवासी कुटुंबाला घर, वीज, नळाद्वारे पाणी, ₹5 लाखांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण आणि दरमहा अन्नधान्य सहाय्य सुनिश्चित केले आहे. शाह म्हणाले की, आदिवासी समाजाची ही चळवळ भविष्यात केवळ आपले संरक्षणच करणार नाही, तर आपल्याला आपल्या भूमी, संस्कृती आणि श्रद्धेशीही जोडून ठेवेल. त्यांनी लोकांना गैरसमजांपासून दूर राहण्याचे, फूट पाडणाऱ्या शक्तींना ओळखण्याचे आणि 2047 पर्यंत विकसित व समृद्ध भारत उभारण्यासाठी एकजुटीने पुढे जाण्याचे आवाहन यावेळी केले. 


नेहा कुलकर्णी/विजयालक्ष्मी साळवी- साने /नितीन गायकवाड/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2264893) अभ्यागत कक्ष : 8