अर्थ मंत्रालय
ईशान्य प्रदेशात तस्करी करून आणलेल्या 60,000 किलो परदेशी सुपाऱ्या महसूल गुप्तचर संचालनालयाने जप्त केल्या; 5 जणांना ताब्यात घेतले
प्रविष्टि तिथि:
22 MAY 2026 3:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 मे 2026
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) गुवाहाटी क्षेत्रीय पथकाने काल तसेच या आठवड्यात सुरुवातीला ईशान्य प्रदेशात केलेल्या दोन मोठ्या कारवायांच्या माध्यमातून 60,000 किलो इतक्या मोठ्या प्रमाणात तस्करी करून आणलेल्या परदेशी सुपाऱ्या जप्त केल्या.
विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे, डीआरआयने मिझोरम तसेच आसाममध्ये केलेल्या कारवाईतून ही जप्ती करण्यात आली आहे. प्राथमिक तपासणीअंती असे निदर्शनास आले आहे की म्यानमारमधून म्यानमार-मिझोरम सीमेच्या मार्गाने या परदेशी बनावटीच्या सुक्या सुपाऱ्यांची भारतात तस्करी करण्यात आली होती. यापैकी एका कारवाईच्या वेळी डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी आसाम रायफल्सची 38वी तुकडी तैनात करण्यात आली होती. आतापर्यंत या कारवायांमध्ये 5 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
शेजारी देशांमधून बेकायदेशीररीत्या भारतात सुपाऱ्या आणण्यात आल्यामुळे देशातील सुपारी उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसत असून सीमावर्ती भागातील आर्थिक सुरक्षा देखील कमकुवत होत आहे.


* * *
शैलेश पाटील/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2264139)
आगंतुक पटल : 66
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Manipuri
,
Khasi
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali-TR
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu