पंतप्रधान कार्यालय
भारत-इटली संबंधांविषयी पंतप्रधानांनी, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत लिहिला विशेष संयुक्त लेख
दोन्ही देशांतील विशेष धोरणात्मक भागीदारी आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली असल्याचे पंतप्रधानांनी केले अधोरेखित
प्रविष्टि तिथि:
20 MAY 2026 3:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मे 2026
भारत- इटली संबंधांविषयीचा एक संयुक्त विशेष लेख, आपण इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या समवेत लिहिला असल्याचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर सांगितले आहे. या लेखात, दोन्ही देशातील द्वीपक्षीय संबंध आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले असल्याविषयी सविस्तर माहिती दिल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
दोन्ही देशांमध्ये असलेला बंध, विशेष धोरणात्मक भागीदारीचा असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले आहे. ह्या घनिष्ट संबंधामागे, नवोन्मेष, सामायिक लोकशाही मूल्ये आणि भविष्यासाठीची सामायिक दूरदृष्टी असल्याचे त्यांनी या लेखात अधोरेखित केले आहे.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले आहे:
"भारत आणि इटली यांच्यातील संबंध आता निर्णायक पातळीवर कसे पोहोचले आहेत, याचे सविस्तर विश्लेषण करणारा एक विशेष लेख, पंतप्रधान मेलोनी यांच्यासोबत लिहिला आहे. आमची ही विशेष धोरणात्मक भागीदारी, नवोन्मेष, सामाईक लोकशाही मूल्ये आणि भविष्यासाठीची सामाईक दूरदृष्टी यांनी प्रेरित आहे."
निलीमा चितळे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2263224)
आगंतुक पटल : 44
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam