पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट ग्रँड क्रॉस प्रदान

प्रविष्टि तिथि: 18 MAY 2026 8:48PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 मे 2026

 

ओस्लो येथे आयोजित एका विशेष समारंभात, नॉर्वेचे महामहीम राजे हेराल्ड पंचम यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट' हा सन्मान प्रदान करण्यात आला. हा नॉर्वेचा परदेशी राष्ट्रप्रमुखांना दिला जाणारा सर्वोच्च सन्मान असून, नॉर्वेच्या हितासाठी आणि मानवतेच्या कल्याणासाठी केलेल्या उल्लेखनीय सेवेच्या सन्मानार्थ तो दिला जातो.

यावेळी बोलताना, पंतप्रधान मोदींनी या सन्मानाबद्दल महामहीम राजे हेराल्ड पंचम आणि नॉर्वेच्या जनतेचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. हा पुरस्कार भारत आणि नॉर्वेच्या नागरिकांमध्ये असलेला निरंतर स्नेह, विश्वास आणि आपुलकीला दिलेली मानवंदना असल्याचे म्हणत त्यांनी हा पुरस्कार भारत आणि नॉर्वे यांच्यातील ऐतिहासिक मैत्रीला समर्पित केला.

हा सन्मान भारत आणि नॉर्वे यांच्यातील दृढ सदिच्छापूर्ण संबंधांचे प्रतीक असून, भविष्यात तो उभय देशांची मैत्री आणि सहकार्याच्या प्रवासासाठी मार्गदर्शक राहील.

 

* * *

निलिमा चितळे/मंजिरी गानू/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2262545) आगंतुक पटल : 50
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam