पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांची नॉर्वेचे महामहिम राजे हॅराल्ड पाचवे यांच्याबरोबर सदिच्छा भेट
प्रविष्टि तिथि:
18 MAY 2026 8:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 मे 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओस्लो येथील राजवाड्यात नॉर्वेचे महामहिम राजे हॅराल्ड पाचवे यांची भेट घेतली.
यावेळी पंतप्रधानांनी त्यांना भारतीय जनतेच्या वतीने शुभेच्छा दिल्या आणि सदिच्छा व्यक्त केली. त्यांनी नॉर्वेच्या नैसर्गिक सौंदर्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, भारत व नॉर्वे यांच्यातील दीर्घकालीन मैत्री दिवसेंदिवस अधिक दृढ होत आहे. या मैत्रीचा पाया लोकशाही, कायद्याचे राज्य आणि लोक- केंद्रित प्रशासन यांसारख्या सामायिक मूल्यांवर रचलेला आहे.
पंतप्रधान मोदी आणि महामहिम राजे हॅराल्ड पाचवे यांनी विविध क्षेत्रांमधील आणि विशेषतः नवीन तंत्रज्ञान क्षेत्रात, भारतीय आणि नॉर्वेच्या कंपन्यांनी केलेल्या उल्लेखनीय प्रगतीवर चर्चा केली.
या भेटीनंतर, महामहिम राजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ दुपारचे स्नेहभोजन दिले.
महामहिम राजांनी केलेल्या आदरतिथ्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले.
* * *
सुषमा काणे/राजेश शिरभाते/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2262540)
आगंतुक पटल : 49
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada