पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांचा यूएई दौराः फलनिष्पत्तींची यादी

Posted On: 15 MAY 2026 3:46PM by PIB Mumbai

अनु. क्र.

सामंजस्य करार/ करार

 उद्दिष्टे

1.

इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह लिमिटेड (ISPRL) आणि अबू धाबी नॅशनल ऑईल कंपनी (ADNOC) यांच्यातील धोरणात्मक सहकार्याबाबतचा सामंजस्य करार

a) विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश येथील सुविधांमधील सहभागासह भारताच्या धोरणात्मक पेट्रोलियम साठ्यामध्ये (SPR) 30 दशलक्ष बॅरलपर्यंत ADNOC च्या कच्च्या तेलाची संभाव्य साठवणूक; आणि चंडीखोल, ओडिशा येथे राखीव साठवणूक सुविधांचा विकास.

(b) भारताच्या धोरणात्मक पेट्रोलियम साठ्याचा भाग म्हणून फुजैराह, यूएई येथे कच्च्या तेलाची संभाव्य साठवणूक.

(c) भारतातील लिक्विड नॅचरल गॅस (LNG) आणि लिक्विड पेट्रोलियम गॅस (LPG) साठवणूक सुविधांमध्ये संभाव्य सहकार्य.

2.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) आणि अबू धाबी नॅशनल ऑईल कंपनी (ADNOC) यांच्यातील लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (LPG) पुरवठ्याबाबतचा धोरणात्मक सहकार्य करार

ADNOC Gas Limited आणि IOCL यांच्यात LPG ची दीर्घकालीन पुरवठा साखळी विकसित करणे आणि LPG च्या खरेदी-विक्रीसाठी दीर्घकालीन करार करण्यासह, या क्षेत्रातील इतर संभाव्य संधींचा शोध घेणे.

3.

धोरणात्मक संरक्षण भागीदारीसाठी आराखडा

संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक सहकार्य, नवोन्मेष आणि प्रगत तंत्रज्ञान, प्रशिक्षण, सराव, शिक्षण आणि तत्त्वप्रणाली, विशेष मोहिमा  आणि आंतर परिचालनक्षमता, सागरी सुरक्षा, सायबर संरक्षण, सुरक्षित दळणवळण आणि माहितीची देवाणघेवाण यासाठीचा एक धोरणात्मक आराखडा.

4.

वाडिनार येथे 'शिप रिपेअर क्लस्टर' स्थापन करण्याबाबत कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) आणि ड्रायडॉक्स वर्ल्ड (DDW) यांच्यातील सामंजस्य करार

 

 

भारत सरकारने सुरू केलेल्या मेरिटाइम डेव्हलपमेंट फंड  योजनेअंतर्गत, ऑफशोअर फॅब्रिकेशनसह  वाडिनार येथे 'शिप रिपेअर क्लस्टर' स्थापन करण्यासाठी सहकार्य.

5.

जहाज दुरुस्ती क्षेत्रातील कौशल्य विकासाबाबत कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL), ड्रायडॉक्स वर्ल्ड (DDW) आणि सेंटर ऑफ एक्सलन्स इन मेरिटाइम अँड शिपबिल्डिंग (CEMS) यांच्यातील सामंजस्य करार

हा त्रिपक्षीय करार कुशल सागरी मनुष्यबळ संघटित करण्यासाठी, त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी आणि रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एक आराखडा तयार करतो. भारतीय सागरी मनुष्यबळाची क्षमता वाढवणे आणि भारताला जहाजबांधणी व जहाज दुरुस्ती क्षेत्रातील कुशल व्यावसायिकांचे केंद्र (hub) म्हणून प्रस्थापित करणे हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे.

6.

CDAC (भारत) आणि G-42 (UAE) यांच्या भागीदारीतून 8 एक्सॅफ्लॉप सुपर कॉम्प्युटिंग क्लस्टर स्थापन करण्याबाबतची टर्म शीट

भारत सरकारच्या AI मिशनचा (AI Mission India) भाग म्हणून सुपर कॉम्प्युटिंग क्लस्टर स्थापन करण्यासाठी CDAC आणि G-42 मधील सहकार्याचा मार्ग खुला करणे.

घोषणा

7.

यूएई कडून भारतात होणारी गुंतवणूक:

(i) भारतातील पायाभूत सुविधा क्षेत्रात 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंतच्या गुंतवणुकीच्या संधी शोधण्यासाठी अबू धाबी इन्व्हेस्टमेंट ऑथोरिटी (ADIA) आणि भारताचा नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर अँड इन्व्हेस्टमेंट फंड (NIIF) यांच्यात सहकार्य.

(ii) भारताच्या आरबीएल बँकमध्ये  एमिरेट्स एनबीडी (ENBD) कडून 3 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक.

(iii) भारताच्या Sammaan Capital मध्ये इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीकडून 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक

 

***

सुषमा काणे/शैलेश पाटील/परशुराम कोर

 

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2261508) अभ्यागत कक्ष : 7