पंतप्रधान कार्यालय
रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
दोन्ही राष्ट्रप्रमुखांच्या डिसेंबर 2025 मधील भेटीनंतर द्विपक्षीय सहकार्यात झालेल्या प्रगतीबद्दल परराष्ट्र मंत्री लावरोव्ह यांनी पंतप्रधानांना दिली माहिती
पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री लावरोव्ह यांच्यात, युक्रेन आणि पश्चिम आशियातील परिस्थितीसह प्रादेशिक आणि जागतिक हिताच्या मुद्यांवर चर्चा
संवाद आणि मुत्सद्देगिरीला प्राधान्य देणाऱ्या भारताच्या भूमिकेचा पंतप्रधानांनी केला पुनरुच्चार
पंतप्रधानांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
14 MAY 2026 7:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 मे 2026
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
23 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेनिमित्त, डिसेंबर 2025 मध्ये दोन्ही देशांच्या प्रमुखांची भेट झाली होती. तेव्हापासून उभय देशांतील द्विपक्षीय संबंधांच्या प्रगतीविषयी, लावरोव्ह यांनी पंतप्रधानांना माहिती दिली.
परराष्ट्र मंत्री लावरोव्ह आणि पंतप्रधान यांच्यात युक्रेन आणि पश्चिम आशियातील परिस्थितीसह, इतर अनेक परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर चर्चा झाली.
सगळे प्रश्न सोडवून, पुढे जाण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीला प्राधान्य देण्याच्या भारताचा सातत्यपूर्ण भूमिकेचा पंतप्रधानांनी यावेळी पुनरुच्चार केला.
रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना आपल्या शुभेच्छा सांगाव्यात, अशी विनंती, पंतप्रधानांनी, परराष्ट्र मंत्री लावरोव्ह यांना केली.
निलीमा चितळे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2261188)
आगंतुक पटल : 58
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam