युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि मायभारत यांनी राष्ट्रव्यापी सहभाग उपक्रमांचा केला प्रारंभ
Posted On:
12 MAY 2026 4:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मे 2026
गुजरातमधल्या अहमदाबाद येथे वर्ष 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर, भारतीय क्रीडा प्राधिकरणाने मायभारतच्या सहयोगाने तीन राष्ट्रव्यापी सहभाग उपक्रमांचा प्रारंभ केला.
या उपक्रमांचा उद्देश देशभरात खिलाडू वृत्ती, सर्जशीलता आणि युवा सहभागाला प्रोत्साहन देणे, हा आहे. या अंतर्गत ‘कॉमनवेल्थ गेम्स 2030 टॉर्च डिझाइन स्पर्धा’, ‘सीडब्ल्यूजी रील चॅलेंज’ आणि ‘कॉमनवेल्थ गेम्स 2030 क्विझ' यांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धा मायभारतच्या सर्व वापरकर्त्यांसाठी खुल्या आहेत आणि त्यांचा उद्देश ‘#CWG2030InBharat’ संदर्भात उत्सुकता आणि जागृती निर्माण करण्याचा आहे.
कॉमनवेल्थ गेम्स 2030 टॉर्च डिझाइन कॉन्टेस्ट

कॉमनवेल्थ गेम्स 2030 टॉर्च डिझाइन कॉन्टेस्ट, या स्पर्धेत नागरिकांना भारताची संस्कृती, वारसा, अभिनवता, शाश्वतता आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टता यांपासून प्रेरित क्रीडा मशालीचे डिझाइन तयार करायचे आहे. या स्पर्धेसाठीच्या प्रवेशिका डिजिटल स्वरूपात किंवा हाताने तयार केलेल्या नमुन्यात सादर करता येतील. तसेच, यासोबत 200 शब्दांपर्यंतची एक ऐच्छिक संकल्पना टीपदेखील जोडता येईल.
ही स्पर्धा 11 मे 2026 ते 20 मे 2026 या कालावधीत ऑनलाइन आयोजित केली जाईल. सहभागी केवळ एकच प्रवेशिका सादर करू शकतात. निवडक विजेत्यांना 'फिट इंडिया हॅम्पर्स'(बक्षिसे) आणि सन्मानपत्रे मिळतील, तर पात्र सहभागींना डिजिटल प्रमाणपत्रे दिली जातील.
अधिक माहितीसाठी- https://mybharat.gov.in/pages/event_detail?event_name=CWG-2030-Torch-Design-Contest&key=644159126644
सीडब्ल्यूजी रील चॅलेंज

या स्पर्धेत सहभागींना, भारताची विकसित होत असलेली क्रीडा संस्कृती, स्थानिक क्रीडा पायाभूत सुविधा, फिटनेस आणि राष्ट्रकुल स्पर्धा 2030 यजमानपदाबाबत उत्साह यांचे दर्शन घडवणारी मूळ रील्स तयार करायची आहेत.
सहभागींना, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2030 साठी भारताच्या सज्जतेचे समर्थन करणारे आणि या वर्षीच्या म्हणजे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 साठी भारतीय पथकाला शुभेच्छा देणारे संदेशही आपल्या रील्समध्ये समाविष्ट करण्यास प्रोत्साहित केले जात आहे. रीलचा कालावधी 60 सेकंदांहून अधिक नसावा.
ही स्पर्धा 07 मे 2026 ते 16 मे 2026 या कालावधीत आयोजित असून सहभागीला केवळ एकाच प्रवेशिकेची मुभा आहे. सर्वोत्तम पाच रील निर्मात्यांना भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून फीट इंडिया हॅम्पर्स मिळणार आहेत.
अधिक माहितीसाठी - https://mybharat.gov.in/pages/event_detail?event_name=CWG-Reel-Challenge&key=139158851139
कॉमनवेल्थ गेम्स 2030 क्विझ

कॉमनवेल्थ गेम्स 2030 क्विझ अर्थात राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा 2030 प्रश्नमंजुषा स्पर्धा, भारताच्या क्रीडा वारशाचा गौरव करण्यासाठी आणि राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या कामगिरीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी आयोजित केली आहे.
या प्रश्नमंजुषेमध्ये 10 बहुपर्यायी प्रश्न असून, ते 5 मिनिटांच्या कालावधीत सोडवणे आवश्यक आहे. पात्र ठरण्यासाठी सहभागींना किमान 8 गुण मिळवणे अनिवार्य आहे. प्रत्येक सहभागीला केवळ एकदाच प्रयत्न करण्याची मुभा आहे.
ही स्पर्धा 09 मे 2026 ते 26 सप्टेंबर 2026 या कालावधीत खुली असून दर आठवड्याला पहिल्या पाच विजेत्यांची नावे जाहीर केली जातील. सहभागींना प्रमाणपत्रेदेखील प्रदान केली जातील.
अधिक माहितीसाठी- https://mybharat.gov.in/quiz/quiz_dashboard/c09vUVNQUjlMKytsTStSQUkyVFhWQT09
हे तिन्ही उपक्रम विनामूल्य असून खेळांमध्ये अधिक लोकसहभागाला विशेषतः युवांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे, तसेच 2030 च्या राष्ट्रकुल स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी सामूहिक उत्साह, सर्जनशीलता आणि राष्ट्राभिमान संवर्धित करण्याच्या उद्देशाने त्यांचे आयोजन करण्यात येत आहे.
नेहा कुलकर्णी/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2260311)
अभ्यागत कक्ष : 70
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam