पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी जन सुरक्षा योजनांना 11 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांचा प्रभाव अधोरेखित केला
पीएम जीवन ज्योती बीमा योजना, पीएम सुरक्षा बीमा योजना आणि अटल पेन्शन योजनेने सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक समावेशकता बळकट केली आहे - पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
09 MAY 2026 6:10PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रालोआ सरकारने 11 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या प्रमुख सामाजिक सुरक्षा आणि निवृत्तीवेतन योजनांचा प्रभाव अधोरेखित केला. ते म्हणाले की हे उपक्रम भारतातील लोकांचा सन्मान, विश्वास आणि आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहेत.
पंतप्रधानांनी नमूद केले की पीएम जीवन ज्योती बीमा योजना आणि पीएम सुरक्षा बीमा योजनेने तळागाळातील लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडला आहे आणि देशातील सामाजिक सुरक्षा चौकट मजबूत केली आहे.
अटल पेन्शन योजनेचे लाभ अधोरेखित करताना मोदी म्हणाले की या योजनेमुळे अनेक लोक त्यांच्या वृद्धापकाळात अधिक सुरक्षित जीवन जगत आहेत आणि सामाजिक सुरक्षा सुलभ व सर्वसमावेशक बनवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचे हे द्योतक आहे.
अटल पेन्शन योजनेअंतर्गत महिलांचा वाढता सहभाग आणि त्यांना मिळणाऱ्या लाभांबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आणि या योजनेच्या यशात नारी शक्तीचे योगदान अधोरेखित केले.
एक्सवर आपले विचार मांडताना मोदी यांनी #11YearsofJanSurakshaSchemes हा हॅशटॅग वापरला.
पंतप्रधानांनी एक्स वर लिहिले;
आजच्याच दिवशी, 11 वर्षांपूर्वी, रालोआ सरकारने प्रमुख सामाजिक सुरक्षा आणि निवृत्तीवेतन योजना सुरू केल्या होत्या. या योजना भारतातील लोकांच्या जीवनात प्रतिष्ठा, विश्वास आणि आर्थिक सुरक्षा आणण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहेत. पंतप्रधान जीवन ज्योती बीमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा बीमा योजनेचा तळागाळावर सकारात्मक प्रभाव पडला आहे, हे या थ्रेडमधून अधोरेखित होते.
#11YearsofJanSurakshaSchemes”
अटल पेन्शन योजना अनेक लोकांसाठी अत्यंत लाभदायक ठरली आहे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या वृद्धापकाळात अधिक सुरक्षित जीवन जगता येत आहे. ही योजना सामाजिक सुरक्षा सुलभ आणि सर्वसमावेशक बनवण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे द्योतक आहे. विशेषतः आमच्या नारी शक्तीला या योजनेचा लाभ होत आहे, हे पाहून आनंद होत आहे.
#11YearsofJanSurakshaSchemes”
अटल पेन्शन योजना अनेक लोकांसाठी अत्यंत लाभदायक ठरली आहे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या वृद्धापकाळात अधिक सुरक्षित जीवन जगता येत आहे. ही योजना सामाजिक सुरक्षा सुलभ आणि सर्वसमावेशक बनवण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे द्योतक आहे. विशेषतः आमच्या नारी शक्तीला या योजनेचा लाभ होत आहे, हे पाहून आनंद होत आहे.… https://t.co/gDNHL7C8Hl
***
सुवर्णा बेडेकर/सुषमा काने/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2259489)
आगंतुक पटल : 54
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
Bengali
,
Assamese
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada