भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

सार्वत्रिक निवडणुका ते विधानसभा निवडणुका आणि पोटनिवडणुका 2026


मतदारांना भुरळ घालण्यासाठी आणलेली 1,400 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेकायदेशीर सामग्री जप्त

Posted On: 07 MAY 2026 5:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 मे 2026

 

1. देशात पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुका, नुकत्याच झालेल्या आसाम, केरळम्, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि 5 राज्यांमधील 7 विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांदरम्यान, आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होत आहे हे सुनिश्चित करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने अनेक उपाययोजना केल्या होत्या. पश्चिम बंगालमधील 144-फाल्टा या विधानसभा मतदारसंघाचा अपवाद वगळता अन्य सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आता आदर्श आचारसंहिता लागू राहणार नाही.

2. निवडणुका पार पाडण्याच्या प्रक्रियेदरम्यान, निवडणूक आयोगाने, ज्या राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांत निवडणुका होत आहेत त्या, तसंच त्यांच्या सीमेलगतची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव, मुख्य निवडणूक  अधिकारी, पोलीस महासंचालक, वरिष्ठ अधिकारी तसंच अंमलबजावणी संस्थांच्या प्रमुखांसोबत अनेक आढावा बैठका घेतल्या.

3. निवडणुका हिंसामुक्त, धाकदपटशाविना आणि प्रलोभनमुक्त होतील हे सुनिश्चित करण्यासाठी, भारतीय महसूल सेवा (प्राप्तीकर), भारतीय महसूल सेवा (सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर), भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा सेवा, भारतीय संरक्षण लेखा सेवा, भारतीय टपाल आणि दूरसंचार लेखा आणि वित्तीय सेवा, अशा  विविध प्रशासकीय सेवांमधील 376 खर्च निरीक्षक, 7,470 भरारी पथके आणि 7,470 स्थिर पाळत पथके (स्टॅटीक सर्व्हेलन्स टीम) देखील तैनात करण्यात आली होती.

4. 'निवडणूक जप्ती व्यवस्थापन प्रणाली (ईएसएमएस) या माहिती-तंत्रज्ञान प्रणालीमुळे, जप्तीची ही कारवाई सुलभ झाली. या प्रणालीमुळे, विविध संस्थांमधील परस्पर समन्वय वाढला, त्यामुळे कारवाई करण्यासाठी, माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी सुसंवाद निर्माण झाला. 26 फेब्रुवारी 2026 रोजी ईएसएमएस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. त्या दिवसापासून दिनांक 6 मे 2026 पर्यंत, करण्यात आलेल्या एकंदर जप्तीचा तपशील खालीलप्रमाणे आहे :

S.N

State

Cash

(Rs.

Crores)

Liquor Qty

(Litres)

Liquor Value (Rs. Crores)

Drugs Value (Rs. Crores)

Precious Metal Value (Rs. Crores)

Freebies

/Other (Rs.

Crores)

Total (Rs.

Crores)

1 .

Tamil Nadu

105. 22

137248. 53

4. 94

78. 61

165. 86

307. 65

662. 28

2.

West Bengal

31 . 14

5858648. 98

151 . 86

130. 28

69. 36

190. 77

573. 41

3.

Assam

6. 07

828248. 33

22. 71

70. 08

3. 68

14. 7

117. 24

4.

Kerala

12. 12

78215. 3

2. 51

58. 47

2. 25

5. 33

80. 67

5.

Puducherry

0. 33

18340. 35

0. 39

0

8. 99

0. 02

9. 72

TOTAL

154. 89

6988793. 38

183. 33

337. 88

250. 14

518. 73

1444. 96

5. वरील तक्त्यातील आकडेवारी, 2021 साली झालेल्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील  सार्वत्रिक निवडणुकांच्या तुलनेत, जप्तीमध्ये 40.14 टक्क्यांनी वाढ झाल्याचं दर्शवते. 2021 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या दरम्यान ही जप्ती 1029.93 कोटी रुपये होती. 2021 साली, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 68.92% आणि तामिळनाडूमध्ये 48.40% वाढ दिसून येत आहे.

 

* * *

शैलेश पाटील/सविता म्‍हस्‍कर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2258783) अभ्यागत कक्ष : 9