गृह मंत्रालय
ऑपरेशन सिंदूरच्या प्रथम वर्षपूर्तीनिमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी सशस्त्र दलांच्या अतुलनीय शौर्याला केला सलाम
'ऑपरेशन सिंदूर' हे भारताचे एक युगप्रवर्तक अभियान असून ते शत्रूंना आपल्या सशस्त्र दलांच्या अचूक प्रहारशक्तीची नेहमीच आठवण करून देत राहिल
सशस्त्र दलांची अचूक प्रहारशक्ती, गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेली बारकाईने संकलित केलेली गुप्त माहिती आणि दृढ राजकीय इच्छाशक्ती या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे सीमेपलीकडील दहशतवादी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले
हा दिवस आपल्या शत्रूंना हा कडवा संदेश देत राहील की, ते कुठेही लपले तरी सुटू शकत नाहीत
ते नेहमीच आपल्या नजरेसमोर आहेत आणि आपल्या प्रचंड शस्त्रबळाच्या तिव्र प्रहाराच्या टप्प्यात आहेत
Posted On:
07 MAY 2026 2:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मे 2026
ऑपरेशन सिंदूरच्या प्रथम वर्षपूर्तीनिमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी सशस्त्र दलांच्या अतुलनीय शौर्याला सलाम केला. ऑपरेशन सिंदूर हे भारताचे एक युगप्रवर्तक अभियान असून ते शत्रूंना आपल्या सशस्त्र दलांच्या अचूक प्रहारशक्तीची कायम आठवण करून देत राहिल, असे ते म्हणाले.
एक्स या समाज माध्यमावरील एका संदेशात केंद्रीय गृहमंत्री म्हणाले,
“ऑपरेशन सिंदूर हे भारताचे एक युगप्रवर्तक अभियान असून ते शत्रूंना आपल्या सशस्त्र दलांच्या अचूक प्रहारशक्तीची कायमच आठवण करून देत राहिल. पहलगाममध्ये आपल्या नागरिकांवर हल्ले करण्याचे धाडस करणाऱ्या दहशतवाद्यांच्या सीमेपलीकडील प्रत्येक ठिकाणाला नष्ट करण्यासाठी आपल्या सशस्त्र दलांची अचूक प्रहारशक्ती, आपल्या गुप्तचर यंत्रणांची बारकाईने गोळा केलेली गुप्त माहिती तसेच दृढ राजकीय इच्छाशक्ती एकजुटीने उभी राहिली तो दिवस म्हणून इतिहास याला कायम स्मरणात ठेवेल. हा दिवस आपल्या शत्रूंना हा कडवा संदेश देत राहील की, ते कुठेही लपले तरी सुटू शकत नाहीत. ते नेहमीच आपल्या नजरेसमोर आणि आपल्या प्रचंड शस्त्रबळाच्या तीव्र प्रहाराच्या टप्प्यात आहेत. आजच्या दिवशी, मी आपल्या सैन्याच्या अतुलनीय शौर्याला सलाम करतो.”
* * *
नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2258695)
अभ्यागत कक्ष : 12
Read this releasein:
Punjabi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali-TR
,
Bengali
,
Assamese
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam