पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
पश्चिम आशियातील ताज्या घडामोडींवर आंतर-मंत्रालयीन पत्रकार परिषद
भारताची खतविषयक सुरक्षा मजबूत, स्थिर आणि सुव्यवस्थित असून सर्व प्रमुख खतांची उपलब्धता सातत्याने गरजेपेक्षा जास्त आहे
एप्रिल 2026 च्या पहिल्या तीन आठवड्यांत एकूण निर्यातीत वार्षिक 20% पेक्षा जास्त वाढ झाली
Posted On:
30 APR 2026 8:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 एप्रिल 2026
पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकार नागरिकांना अद्ययावत माहिती नियमित देत आहे.
खतांच्या साठ्याची स्थिती आणि उपलब्धता
देशातील खतांच्या साठ्याची एकूण स्थिती
|
Product
|
As on today
|
As on today last year
|
|
Urea
|
73.32
|
72.90
|
|
DAP
|
22.38
|
15.44
|
|
NPKs
|
58.45
|
45.14
|
|
SSP
|
26.60
|
26.38
|
|
MOP
|
12.63
|
12.89
|
|
Total
|
193.38
|
172.75
|
खरीप 2026 साठी कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने खतांची गरज 390.54 लाख मेट्रिक टन असल्याचा अंदाज वर्तविला आहे. या तुलनेत, आजच्या तारखेला साठा सुमारे 193.38 लाख मेट्रिक टन (अंदाजे 50%) आहे, जो सुमारे 33% या नेहमीच्या पातळीपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. हे शासनाचे सुधारित नियोजन, आगाऊ साठवण आणि कार्यक्षम वाहतूक व्यवस्थापन दर्शवते.
राज्यांमध्ये पुरवठ्याची स्थिती मजबूत आहे. 1 एप्रिल 2026 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीसाठी उपलब्धता गरजेपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. 22.91 लाख मेट्रिक टन गरजेच्या तुलनेत युरियाची उपलब्धता 73.81 लाख मेट्रिक टन आहे,
7.44 लाख मेट्रिक टन गरजेच्या तुलनेत डीएपीची उपलब्धता 23.47 लाख मेट्रिक टन आहे, एमओपीची उपलब्धता 8.54 लाख मेट्रिक टन आहे तर गरज 2.18 लाख मेट्रिक टन आहे, 9.40 लाख मेट्रिक टन गरजेच्या तुलनेत एनपीकेची उपलब्धता 54.04 लाख मेट्रिक टन आहे आणि 4.16 लाख मेट्रिक टन गरजेच्या तुलनेत एसएसपीची उपलब्धता 26.20 लाख मेट्रिक टन आहे. यावरून चालू खरीप हंगामासाठी सुरुवातीची मजबूत स्थिती स्पष्टपणे दिसून येते.
प्रमुख खतांच्या एमआरपीमध्ये कोणताही बदल नाही
|
Product
|
(Rs. Per Bag)
|
|
Urea
|
266.5
|
|
DAP
|
1350
|
|
TSP
|
1300
|
संकटकाळानंतर खतांचे देशांतर्गत उत्पादन आणि आयात
|
Product
|
Domestic production after crisis
|
Import reached on Indian Ports after crisis
|
|
Urea
|
37.49
|
9.98
|
|
DAP
|
4.79
|
0.76
|
|
NPKs
|
12.69
|
2.55
|
|
SSP
|
7.40
|
0
|
|
MOP
|
0
|
2.10
|
|
Total
|
62.37
|
15.39
|
संकटकाळानंतर उपलब्धतेमध्ये एकूण अंदाजे 78 लाख मेट्रिक टन खतांची भर पडली आहे.
जागतिक युरिया निविदा – भारताने फेब्रुवारी अखेरपासून आजपर्यंत एकूण 38.07 लाख मेट्रिक टन (13.07 लाख मेट्रिक टन आरसीएफ + 25 लाख मेट्रिक टन आयपीएल) युरिया सुरक्षित केला आहे.
डीएपी, टीएसपी आणि अमोनियम सल्फेटसाठी जागतिक निविदा- भारतीय खत कंपन्यांनी शुक्रवार, 24.04.2026 रोजी 12 लाख मेट्रिक टन डीएपी, 4 लाख मेट्रिक टन टीएसपी आणि 3 लाख मेट्रिक टन अमोनियम सल्फेटच्या खरेदीसाठी एकत्रित जागतिक निविदा जारी केली आहे. यामुळे ऐन हंगामात पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होण्यास मदत होईल.
वाणिज्य मंत्रालयाकडून अद्ययावत माहिती:
- एप्रिल 2026 च्या पहिल्या तीन आठवड्यांत (01 ते 21 एप्रिल) एकूण निर्यातीत वार्षिक तुलनेत 20% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.
- 1 ते 21 एप्रिल 2026 या कालावधीत ज्या प्रमुख उत्पादनांच्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे, ती म्हणजे पेट्रोलियम उत्पादने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू.
ऊर्जा पुरवठा आणि इंधनाची उपलब्धता
सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीतही सरकारने देशांतर्गत एलपीजी, देशांतर्गत पीएनजी आणि सीएनजी (वाहतूक) यांना 100% पुरवठा सुनिश्चित केला आहे.
अंमलबजावणी आणि देखरेखविषयक कृती
- एलपीजीची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी देशभरात कारवाई सुरू आहे. काल देशभरात 2300 हून अधिक छापे टाकण्यात आले.
- सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी आपली तपासणी मोहीम अधिक तीव्र केली असून, त्यांनी 336 एलपीजी वितरण केंद्रांवर अचानक तपासण्या करून, दंड ठोठावला. तसेच, कालपर्यंत 72 एलपीजी वितरण केंद्रांचे परवाने स्थगित करण्यात आले.
- 29.04.2026 रोजी, 50 एलपीजी वितरकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आणि 11 वितरकांना दंड ठोठावण्यात आला.
एलपीजी पुरवठा
- 29.04.2026 रोजी 47 लाखांहून अधिक घरगुती एलपीजी सिलेंडर वितरित करण्यात आले. सुमारे 43 लाख एलपीजी सिलिंडरचे बुकिंग होते.
व्यावसायिक एलपीजी पुरवठा आणि वाटप उपाययोजना:
- फेब्रुवारी 2026 मध्ये 5 किलोचे एकूण 21.7 लाख एफटीएल सिलिंडर्स विकले गेले. तथापि, 1 एप्रिल 2026 पासून आतापर्यंत सुमारे 21.75 लाख 5 किलोचे एफटीएल सिलिंडर्स विकले गेले.
- काल, सुमारे 70,000, 5 किलोचे एफटीएल सिलिंडर वितरित करण्यात आले.
- 3 एप्रिल 2026 पासून, सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी 5 किलो एफटीएल सिलिंडरसाठी 9750 हून अधिक जागरूकता शिबिरे आयोजित केली. यात 1,64,000 पेक्षा जास्त 5 किलोच्या एफटीएल सिलिंडर्सची विक्री करण्यात आली.
- काल, सुमारे 190 शिबिरांद्वारे 5663, 5 किलोच्या एफटीएलची विक्री झाली.
- एप्रिल 2026 मध्ये (29.04.26 पर्यंत), एकूण 1,92,532 मेट्रिक टन (19 किलोच्या 101.33 लाखांहून अधिक एलपीजी सिलिंडर्सच्या समतुल्य) व्यावसायिक एलपीजी ची विक्री झाली.
- एप्रिल 2026 (29.04.2026 पर्यंत) मध्ये सुमारे 10250 मेट्रिक टन ऑटो एलपीजीची विक्री झाली. फेब्रुवारी 2026 मध्ये ती सुमारे 5000 मेट्रिक टन होती.
नैसर्गिक वायू पुरवठा आणि पीएनजी विस्तार उपक्रम
- मार्च 2026 पासून, सुमारे 5.78 लाख पीएनजी जोडण्यांना गॅसपुरवठा सुरू करण्यात आला, आणि अतिरिक्त 2.66 लाख जोडण्यांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या. यामुळे एकूण जोडण्यांची संख्या 8.44 लाखांवर पोहोचली. याव्यतिरिक्त, नवीन जोडण्यांसाठी सुमारे 6.47 लाख ग्राहकांची नोंदणी करण्यात आली.
- 29.04.2026 पर्यंत, 43,050 पेक्षा जास्त पीएनजी ग्राहकांनी MYPNGD.in संकेतस्थळाद्वारे त्यांचे एलपीजी कनेक्शन परत केले.
सागरी सुरक्षा आणि जहाज वाहतूक परिचालन
- नौवहन महासंचालनालय नियंत्रण कक्षाकडून प्राप्त माहिती : नियंत्रण कक्षाने कार्यान्वित झाल्यापासून 8,155 कॉल आणि 17,399 हून अधिक ईमेल हाताळले. गेल्या 24 तासांत 121 कॉल आणि 285 ई-मेल प्राप्त झाले.
- मंत्रालयाने नौवहन महासंचालनालयाच्या माध्यमातून आतापर्यंत 2,857 हून अधिक भारतीय खलाशांच्या सुरक्षित मायदेशी परतण्याची सोय केली. यात गेल्या 24 तासांत आखाती प्रदेशातील विविध ठिकाणांहून परतलेल्या 28 खलाशांचा समावेश आहे.
संघर्षग्रस्त प्रदेशातील भारतीय नागरिकांची सुरक्षा
परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आखाती आणि पश्चिम आशिया प्रदेशातील घडामोडींवर सातत्याने लक्ष ठेवत असून, या क्षेत्रातील भारतीय समुदायाची सुरक्षा, संरक्षण आणि कल्याण सुनिश्चित करण्यावर विशेष भर देत आहे. या प्रदेशातून भारतातील विविध गंतव्यस्थानांकडे अतिरिक्त विमानांची वाहतूक सुरू झाल्यामुळे, एकूणच विमानसेवेची स्थिती सुधारत आहे.
* * *
निलिमा चितळे/सोनाली काकडे/नंदिनी मथुरे/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2257142)
अभ्यागत कक्ष : 13
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam