पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पादत्राणे निर्मिती उद्योगात तांत्रिक वस्त्रांची भूमिका अधोरेखित करणारा एक लेख केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
29 APR 2026 6:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 एप्रिल 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पादत्राणे निर्मिती उद्योगात तांत्रिक वस्त्रांची भूमिका आणि एकत्रीकरण याची माहिती देणारा केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी लिहिलेला लेख आज सामायिक केला.
तांत्रिक वस्त्रांचा पादत्राणे उद्योगातील वापर ही केवळ एक उदयाला येणारी संकल्पना नसून ती या उद्योगात खोलवर रुजलेली आहे, यावर अत्यंत सोप्या शब्दात मात्र तितक्याच प्रभावीपणे भाष्य करणारा हा लेख असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:
या लेखात केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी तांत्रिक वस्त्रांचा पादत्राणे उद्योगातील वापर ही केवळ एक नव्याने उदयाला येणारी संकल्पना नसून ती आधीपासूनच या उद्योगात रुजलेली आहे, हे अतिशय सोप्या रीतीने मात्र अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे.
पादत्राणे क्षेत्राला अधिक स्पष्टपणे तांत्रिक वस्त्रांच्या परिसंस्थेच्या कक्षेत समाविष्ट करण्याच्या हेतूने या एकत्रीकरणाची योग्य ओळख करून घेणे, नियोजन करणे आणि त्याची व्याप्ती वाढवणे, हे आपल्यासमोरील महत्त्वाचे कार्य आहे यावर सिंह यांनी भर दिला आहे.
* * *
निलिमा चितळे/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2256701)
आगंतुक पटल : 41
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam