गृह मंत्रालय
पद्म पुरस्कार- 2027 साठी नामनिर्देशनाकरिता 31 जुलै, 2026 पर्यंत मुदत
प्रविष्टि तिथि:
27 APR 2026 4:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 एप्रिल 2026
दरवर्षी प्रजासत्ताक दिनी 'पद्म पुरस्कार’ जाहीर केले जातात. आगामी 'पद्म पुरस्कार-2027' साठीची नामनिर्देशने/शिफारसी 15 मार्च, 2026 पासून स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामनिर्देशने सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै, 2026 आहे. पद्म पुरस्कारांसाठीची नामनिर्देशने/शिफारसी केवळ 'राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल' (https://awards.gov.in) वर ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारल्या जाणार आहेत.
पद्म पुरस्कार - म्हणजेच पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री - हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी आहेत. 1954 मध्ये सुरू करण्यात आलेले हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जाहीर केले जातात. या पुरस्कारांचा उद्देश नागरिकांनी केलेल्या 'विशेष कामगिरी'चा गौरव करणे हा आहे. यामध्ये कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय, समाजकार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग इत्यादी सर्व क्षेत्रांमधील/विषयांमधील विशिष्ट आणि असामान्य कामगिरीसाठी/सेवेसाठी हे पुरस्कार दिले जातात. वंश, व्यवसाय, पद किंवा लिंग अशाप्रकारचा कोणताही भेदभाव न करता, सर्व व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहेत. डॉक्टर आणि शास्त्रज्ञ वगळता सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसह सरकारी कर्मचारी पद्म पुरस्कारासाठी पात्र नाहीत.
पद्म पुरस्कारांचे रूपांतर 'लोकांचे पद्म' मध्ये करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे, सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी या पुरस्कारांसाठी नामनिर्देशने / शिफारसी सादर कराव्यात; यामध्ये स्वतःचे नामनिर्देशन करण्याचाही समावेश आहे. महिला, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती आणि समाजाच्या नि:स्वार्थ सेवेत उत्कृष्टता दाखवणाऱ्या आणि अनोखी, उत्तम कामगिरी करणाऱ्या गुणवान व्यक्तींना शोधण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जावेत.
नामनिर्देशनांमध्ये / शिफारसींमध्ये, वर नमूद केलेल्या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विशिष्ट नमुन्यामध्ये निर्दिष्ट केलेले सर्व संबंधित तपशील समाविष्ट असावेत. यामध्ये कार्याचा वर्णनात्मक स्वरूपातील तपशिलाचा समावेश असणे आवश्यक आहे (जास्तीत जास्त 800 शब्द); यात, शिफारस केलेल्या व्यक्तीची तिच्या संबंधित क्षेत्रातील/विषयातील विशिष्ट आणि असाधारण कामगिरी/सेवा स्पष्टपणे अधोरेखित केलेली असावी.
या संदर्भातील तपशील गृह मंत्रालयाच्या (https://mha.gov.in) संकेतस्थळावर 'Awards and Medals' (पुरस्कार आणि पदके) या शीर्षकाखाली, तसेच 'पद्म पुरस्कार पोर्टल'वर (https://padmaawards.gov.in) उपलब्ध आहेत. या पुरस्कारांशी संबंधित नियमावली संकेतस्थळावर https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx या दुव्यावर उपलब्ध आहे.
* * *
निलिमा चितळे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2255931)
आगंतुक पटल : 87
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
Assamese
,
Khasi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam