सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
भिकारी/निवारा गृहांची निगा, पुनर्वसन आणि व्यवस्थापनाबाबतच्या आदर्श मार्गदर्शक तत्त्वांचे चिंतन शिबिरात अनावरण
Posted On:
25 APR 2026 11:35AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 एप्रिल 2026
भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने, 24 ते 26 एप्रिल 2026 दरम्यान चंदीगड येथे आयोजित केलेल्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या चिंतन शिबिरात 'भिकारी/निवारा गृहांची निगा, पुनर्वसन आणि व्यवस्थापन' यावरील 'आदर्श मार्गदर्शक तत्त्वांचे' अनावरण केले.
या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि क्षमता, पोषण आणि अन्नसुरक्षा, व्यावसायिक प्रशिक्षण आणि पुनर्वसन, कायदेशीर मदत आणि जनजागृती, बालक आणि लिंग भाव याबाबत संवेदनशील दृष्टिकोन, तसेच उत्तरदायित्व आणि देखरेख अशा महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश असलेला सर्वसमावेशक आराखडा प्रदान करण्यात आला आहे. तसेच, या निर्देशांची सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकसमान अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी विविध केंद्र आणि राज्य सरकारी योजनांशी समन्वय साधण्यावरही भर देण्यात आला आहे.
देशभरातील भिकारी/निवारा गृहांमध्ये मानवी आणि सन्मानजनक राहणीमान सुनिश्चित करण्यासाठी या मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे आवाहन मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केले आहे.
* * *
नेहा कुलकर्णी/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2255473)
अभ्यागत कक्ष : 12