पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी आदि शंकराचार्यांना आदरांजली वाहिली

Posted On: 21 APR 2026 2:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 एप्रिल 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदि शंकराचार्यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. मोदी म्हणाले की, त्यांची गहन शिकवण, विचार आणि अद्वैत वेदान्ताचे तत्त्वज्ञान जगभरातील असंख्य लोकांना मार्गदर्शन करत आले आहे. तसेच, आध्यात्मिक विचारांना पुनरुज्जीवित करण्याचे आणि देशभरात आध्यात्मिक केंद्रे स्थापन करण्याचे त्यांचे प्रयत्न चिरस्थायी प्रेरणास्थान आहेत. "त्यांचे ज्ञान आपला मार्ग प्रकाशित करत राहो आणि सत्य, करुणा व सामूहिक कल्याणाप्रती असलेली आपली वचनबद्धता अधिक दृढ करो," असेही मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:

"भारताच्या महान आध्यात्मिक गुरूंपैकी एक असलेल्या आदि शंकराचार्यांना जयंतीच्या पवित्र प्रसंगी आदरांजली. त्यांची गहन शिकवण, विचार आणि अद्वैत वेदान्ताचे तत्त्वज्ञान जगभरातील असंख्य लोकांना मार्गदर्शन करत आहे. त्यांनी सुसंवाद, शिस्त आणि सर्वांच्या अस्तित्वाच्या एकात्मकतेवर भर दिला. आध्यात्मिक विचारांना पुनरुज्जीवित करण्याचे आणि देशभरात आध्यात्मिक केंद्रे स्थापन करण्याचे त्यांचे प्रयत्न चिरंतन प्रेरणादायी आहेत. त्यांचे ज्ञान आपला मार्ग प्रकाशित करत राहो आणि सत्य, करुणा व सामूहिक कल्याणाप्रती आपली वचनबद्धता दृढ करो.”

सुषमा काणे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर‍

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2254105) अभ्यागत कक्ष : 16