पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी भगवान परशुराम जयंतीनिमित्त दिल्या शुभेच्छा

Posted On: 19 APR 2026 10:53AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी भगवान परशुराम जयंतीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की भगवान परशुराम आपल्याला अन्यायाविरुद्ध लढा देण्याची आणि सत्याच्या मार्गावर ठाम उभे राहण्याची प्रेरणा देतात. भगवान परशुराम हे अतुलनीय शौर्य आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक आहेत, असे त्यांनी नमूद केले.

भगवान परशुरामांच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या हृदयात नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण होईल, अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली. तसेच, भगवान परशुरामांचे आशीर्वाद सर्वांचे जीवन सुख, शांती आणि समृद्धीने उजळून टाकतील, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधानांनी 'X' वरील पोस्टमध्ये म्हटले आहे;

"आप सभी को भगवान परशुराम जयंती की ढेरों शुभकामनाएं। उनसे हमें अन्याय के विरुद्ध खड़े होने और सत्य के मार्ग पर अडिग रहने की प्रेरणा मिलती है। अतुलनीय पराक्रम और विवेक के प्रतीक भगवान परशुराम की कृपा से हर हृदय में नई ऊर्जा और नए आत्मविश्वास का संचार हो। उनका आशीर्वाद सभी के जीवन को सुख, शांति और समृद्धि से आलोकित करे।”

***

यश राणे/पर्णिका हेदवकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2253488) अभ्यागत कक्ष : 19