गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महिला आरक्षण विधेयक ही काळाची गरज असल्याचे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन

प्रविष्टि तिथि: 14 APR 2026 7:31PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 एप्रिल 2026

 

महिला आरक्षण विधेयक ही सध्याच्या काळाची गरज आहे आणि हा कायदा आणून त्याची अंमलबजावणी करण्याप्रती मोदी सरकार कटिबद्ध आहे, असे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.

X मंचावरील संदेशात केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणतात, “महिला आरक्षण विधेयक ही सध्याच्या काळाची गरज आहे. धोरण निर्मितीमध्ये योगदान देणे आणि आपल्या देशाला सक्षम करणे हा आपल्या नारीशक्तीचा हक्कच आहे. हा कायदा आणून तो लागू करण्याप्रती मोदी सरकार कटिबद्ध आहे. सर्वांच्या भल्यासाठी विनाविलंब आणि निश्चितपणे हा बदल घडायला हवा. प्रत्येकजण पुढे येऊन या ऐतिहासिक घडामोडीसाठी पाठींबा देईल, अशी आशा मला वाटते.”

 

* * *

माधुरी पांगे/संजना चिटणीस/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2251952) आगंतुक पटल : 77
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Bengali-TR , Punjabi , Gujarati , Telugu , Telugu , Kannada