गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केंद्रीय राखीव पोलीस दल शौर्य दिना निमित्त हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
Posted On:
09 APR 2026 3:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 एप्रिल 2026
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केंद्रीय राखीव पोलीस दल -सीआरपीएफ शौर्य दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन केले.
एक्स या समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले की, "सीआरपीएफ शौर्य दिनानिमित्त आपल्या वीर सैनिकांच्या शौर्य आणि बलिदानाला माझा सलाम. 1965 मध्ये आजच्याच दिवशी, सीआरपीएफच्या निर्भय योद्ध्यांनी कच्छच्या रणामधील 'सरदार पोस्ट' येथे अभेद्य भिंतीप्रमाणे उभे राहत शत्रूचे मनसुबे उधळून लावले आणि भारताच्या इतिहासात शौर्याचा एक सुवर्ण अध्याय लिहिला. देशाचा सन्मान आणि सुरक्षेसाठी आपले सर्वोच्च बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन."
निलीमा चितळे/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2250438)
अभ्यागत कक्ष : 18