भारतीय निवडणूक आयोग
सार्वत्रिक निवडणूक आणि पोटनिवडणूक 2026: निवडणूक पूर्व शांतता काळात निवडणूक संबंधित माहितीचे प्रदर्शन आणि जनमत कल चाचणी प्रसिध्द करण्यास प्रतिबंध
Posted On:
02 APR 2026 3:26PM by PIB Mumbai
1.भारतीय निवडणूक आयोगाने आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक आणि गोवा, गुजरात,कर्नाटक, महाराष्ट्र, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यातील आठ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचे वेळापत्रक 15 मार्च 2026 रोजी जाहीर केले.
2. लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951 चे कलम 126 (1)(बी), अन्वये कोणत्याही निवडणुकीच्या क्षेत्रामध्ये मतदानाच्या समाप्तीसाठी निश्चित केलेल्या वेळेपूर्वी अठ्ठेचाळीस तासांच्या (शांतता कालावधी) कालावधीत कोणत्याही मतदान क्षेत्रामध्ये कोणत्याही माध्यमातून, अथवा दूरचित्रवाणी किंवा तत्सम उपकरणांद्वारे कोणतीही निवडणूक संबंधित माहिती प्रदर्शित करण्यास मनाई आहे.
3. या राज्यांमधील मतदान खालील वेळापत्रकानुसार घेतले जाईल.
|
Name of State/UT going for general elections
|
Poll Date
|
Silence period
|
|
Assam
|
09.04.2026
|
5:00 PM (07.04.26)
To 5:00 PM (09.04.26)
|
|
Kerala and Puducherry
|
09.04.2026
|
6:00 PM (07.04.26)
To 6:00 PM (09.04.26)
|
|
Tamil Nadu
|
23.04.2026
|
6:00 PM (21.04.2026)
To 6:00 PM (23.04.2026)
|
|
West Bengal
|
23.04.2026 (Phase I)
|
6:00 PM (21.04.2026)
To 6:00 PM (23.04.2026)
|
|
29.04.2026(Phase II)
|
6:00 PM (27.04.2026)
To 6:00 PM (29.04.2026)
|
4. त्यानुसार, आयोग पुनरुच्चार करत आहे की, टीव्ही/रेडिओ चॅनेल आणि केबल नेटवर्क्सनी हे सुनिश्चित केले पाहिजे की, वर नमूद केलेल्या कालावधीत त्यांच्याद्वारे प्रसारित केलेल्या/प्रक्षेपित केलेल्या/प्रदर्शित केलेल्या कार्यक्रमात किंवा दोन कार्यक्रमांच्या दरम्यान, कार्यक्रमात सहभागी पॅनेलच्या सदस्यांची संभाषणे /सहभागींची आणि इतर दृश्ये/आवाहने, इत्यादींमध्ये कोणत्याही विशिष्ट पक्षाचा किंवा उमेदवाराचा प्रचार / त्याविषयी पूर्वग्रह बनवणारी माहिती किंवा कोणत्याही निवडणूक परिणामावर प्रभाव पाडणारी अथवा मतदारांचे मतपरिवर्तन करू शकणारी माहिती नसावी. यामध्ये सर्व प्रकारच्या ओपिनियन पोलचे प्रदर्शन देखील समाविष्ट आहे.
5. लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 च्या कलम 126 -ए अंतर्गत आयोगाने अधिसूचित केले आहे की, 9 एप्रिल 2026 (गुरुवार) रोजी सकाळी 7:00 आणि 29 एप्रिल 2026 (बुधवार) रोजी संध्याकाळी 6.30 च्या दरम्यान जनमत कल चाचण्या आयोजित करणे आणि त्यांचे निकाल छापील किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसारित करणे प्रतिबंधित आहे. लोकप्रतिनिधित्व कायदा , 1951 च्या कलम 126A चे उल्लंघन केल्यास दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
6. आयोगाने सर्व प्रसिध्दी माध्यम संस्थाचालकांना या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.
***
सुवर्णा बेडेकर/उमा रायकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
Goa
Follow us on social media:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pibpanaji
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBPanaji
/pibpanaji
(Release ID: 2248533)
अभ्यागत कक्ष : 26