पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत भारत कशा प्रकारे कुतूहलाची जोपासना करत आहे आणि सर्वांगीण विकास साधला जात आहे याबद्दलचा लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
01 APR 2026 8:08PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमावर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत पायाभूत साक्षरता आणि आनंददायी शिक्षणावर दिला गेला असून, त्याद्वारे भारत कशाप्रकारे विद्यार्थ्यांमधील कुतूहल जोपासतो आहे, तसेच त्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे याची मांडणी धर्मेंद्र प्रधान यांनी या लेखामधून,केली आहे. शाळेचा पहिला दिवस म्हणजे केवळ एक सुरुवात नसते, तर त्यासोबतच ती विद्यार्थ्यांमध्ये रुजवली जाण्याची गरज असलेली, एक परस्पर सामायिक राष्ट्रीय जबाबदारी असते असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
या संदर्भात पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश :
शाळेचा पहिला दिवस ही केवळ एक सुरुवात नसते, तर त्यासोबतच ती विद्यार्थ्यांमध्ये रुजवली जाण्याची गरज असलेली, एक परस्पर सामायिक राष्ट्रीय जबाबदारीही असते ! राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत, भारत पायाभूत साक्षरता आणि आनंददायी शिक्षणावर प्रचंड भर देत असून, त्याद्वारे कुतूहल जोपासले जात आहे आणि सर्वांगीण विकास साधला जात आहे.
अधिक तपशीलात जाणून घेण्यासाठी केंद्रीय मंत्री @dpradhanbjp यांचा हा लेख अवश्य वाचा.
***
नेहा कुलकर्णी/तुषार पवार/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2248078)
आगंतुक पटल : 46
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam