पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगाची क्षणचित्रे केली सामायिक

Posted On: 28 MAR 2026 10:24PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 मार्च 2026

 

उत्तरप्रदेशात जेवर इथल्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याची क्षणचित्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केली आहेत. या कार्यक्रमाबद्दलचा आनंद आणि अभिमानाची भावना व्यक्त करत, हा दिवस विकसित भारत आणि विकसित उत्तर प्रदेशाच्या पर्वात नवा अध्याय लिहिणारा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. भारताचे हे सर्वात मोठे राज्य, आता सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळे असलेल्या राज्यांपैकी एक राज्य ठरले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सोशल मीडिया च्या एक्स वर लिहिलेल्या मालिकेत ते म्हणतात: -

“नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल भवनात अत्याधुनिक सुविधा बघून, मनाला अत्यंत समाधान वाटले. या विमानतळामुळे वाहतूक, गुंतवणूक आणि विकासाला नवी गती मिळणार आहे.”

 

“नोएडा इथल्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या कुटुंबियांचा उत्साह स्पष्ट सांगतो आहे, की उत्तरप्रदेशासह देशभरात होणाऱ्या जलद विकासाविषयी ते अत्यंत आनंदी आणि उत्साहीत आहेत.”

 

“आज ज्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले, तो दुहेरी इंजिनच्या सरकारचे प्रयत्न आणि आमची कार्यसंस्कृती यांचे उत्तम उदाहरण आहे यामुळे, लक्षात येते की, युद्धाच्या जागतिक संकटाच्या दरम्यानही भारत सातत्यपूर्ण प्रगती करतो आहे.”

 

"आमच्या सरकारने नुकतीच, उडान योजनेच्या विस्ताराला मंजुरी दिली आहे, ज्यामुळे, येत्या काही वर्षात छोट्या छोट्या शहरांमध्ये 100 नवी विमानतळे आणि 200 हेलीपॅड बनवण्याची योजना आहे. उत्तरप्रदेशालाही त्याचा मोठा लाभ मिळेल."

 

“आमचे सरकार, विमानांचे व्यवस्थापन, दुरुस्ती आणि देखभाल, म्हणजेच एमआरओ सुविधांचा खूप मोठ्या प्रमाणात विकास करत आहे. यामुळे, देशाचे उत्पन्न वाढेल आणि युवकांनाही रोजगार मिळेल.”

 

“विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी आमचे सरकार आधुनिक पायाभूत सुविधामध्ये अभूतपूर्व गुंतवणूक करत आहे. मेट्रो आणि वंदे भारत सारख्या गाड्या आणि बंदराच्या क्षमतांचा विस्तार याचेच फळ आहे.”

 

“पश्चिम आशियात सुरु असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटाचा सामना आपल्याला संपूर्ण धैर्य आणि एकजुटीने करायचा आहे. त्याच संदर्भात, सर्व राजकीय पक्षांना माझा आग्रह आहे."

 

* * *

शैलेश पाटील/राधिका अघोर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2246593) अभ्यागत कक्ष : 7