रेल्वे मंत्रालय
रेल्वेमंत्र्यांनी कवच अंमलबजावणीच्या प्रगतीचा घेतला आढावा
कवच 4.0 च्या जलद अंमलबजावणीसाठी रेल्वेने कवच अंतर्गत स्वदेशी युनिव्हर्सल ब्रेकिंग अल्गोरिदम केला विकसित
Posted On:
26 MAR 2026 7:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 मार्च 2026
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतीय रेल्वेने स्वदेशी बनावटीने विकसित केलेल्या 'कवच' या 'स्वयंचलित रेल्वे सुरक्षा प्रणाली'च्या (एटीपी) प्रगतीचा आढावा घेतला. या बैठकीत या प्रणालीच्या अंमलबजावणीला गती देण्यावर, तसेच रेल्वेचे कामकाज अधिक कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्यात आला.
कवचला चालना देणारी तांत्रिक प्रगती
भारतीय रेल्वेने कवचमध्ये अनेक अत्याधुनिक सुधारणा केल्या आहेत. युनिव्हर्सल ब्रेकिंग अल्गोरिदम (यूबीए), जो विविध उत्पादकांच्या ब्रेकिंग कर्व्हचे मानकीकरण करतो, आंतरकार्यक्षमता सुनिश्चित करतो आणि पुनरावृत्ती होणाऱ्या चाचण्या दूर करतो. बेसलाइन सॉफ्टवेअरमधील महत्त्वपूर्ण सुधारणा, एआय-चालित आरेखन स्वयंचलन आणि लोकोमोटिव्ह, इंटरलॉकिंग सिस्टीम व ट्रॅक मशीनसाठीचे इंटिग्रेशन इंटरफेस यामुळे या प्रणालीची मजबुती आणखी वाढली आहे.
कवच प्रणालींचे रिअल-टाइम निरीक्षण आणि भविष्यसूचक देखभाल निश्चित करण्यासाठी एकीकृत कार्यसंचालन व्यवस्थापन प्रणाली म्हणून 'सुरक्षा' नावाचा केंद्रीकृत देखरेख मंच देखील विकसित केला जात आहे.
आतापर्यंतची प्रगती
आतापर्यंत 3,103 मार्ग किलोमीटरवर कवच स्थापित करण्यात आले आहे. उच्च-घनता आणि उच्च-वापर असलेल्या कॉरिडॉरच्या समावेशासह 24,427 मार्ग किलोमीटरवर कवचचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.
आवृत्ती 4.0 च्या अंमलबजावणीचा भाग म्हणून:
- दिल्ली–मुंबई आणि दिल्ली–हावडा यांसारख्या प्रमुख मार्गांवर 1,638 मार्ग किलोमीटरवर काम यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आले आहे.
- नुकतेच, भारतीय रेल्वेने दिल्ली–हावडा उच्च-घनता मार्गावरील प्रयागराज–कानपूर विभागाच्या 190 मार्ग किलोमीटरवर 'कवच' प्रणाली कार्यान्वित केली आहे.
- 7,100 मार्ग किलोमीटरवर रुळांच्या कडेला आवश्यक त्या यंत्रणा बसवण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.
- 8,921 किलोमीटर अंतरावर ऑप्टिकल फायबर केबलचे (ओएफसी) काम झाले असून 1,183 दूरसंचार टॉवर्स आणि 767 स्थानकांवर 'कवच' डेटा सेंटर्सद्वारे याला सहाय्य पुरवण्यात आले आहे.
- 4,277 रेल्वे इंजिनांवर 'कवच' प्रणाली बसवण्यात आली आहे.
- 8,979 इंजिनांवर हे काम सध्या प्रगतीपथावर आहे.
विस्तार योजना
'कवच' प्रणाली बसवणे ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. या प्रणालीच्या अंमलबजावणीचा आणखी विस्तार करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढील दोन वर्षांत 'कवच' नेटवर्कचा 9,000 मार्ग-किलोमीटरने विस्तार करण्याची योजना आखली आहे. त्यानंतर दरवर्षी हे नेटवर्क 10,000 मार्ग-किलोमीटरने विस्तारण्याची अपेक्षा आहे.
* * *
निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2245747)
अभ्यागत कक्ष : 11