गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बिहार दिनानिमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या बिहारच्या जनतेस मनःपूर्वक शुभेच्छा


समृद्ध संस्कृती, परंपरा आणि वैशिष्ट्यपूर्ण कलाप्रकारांसाठी ओळखला जाणारा बिहार, सामाजिक न्याय आणि बौद्धिक जागृतीच्या मार्गावर देशाला सातत्याने दिशा देत आला आहे

नालंदा आणि विक्रमशिला येथील वैभवशाली शिक्षणपरंपरेपासून ते स्वातंत्र्यलढा आणि आणीबाणीपर्यंत, बिहारने प्रत्येक काळात भारताच्या राष्ट्रनिर्मितीत अमूल्य योगदान दिले आहे

आज आपल्या विशाल वारसा आणि परंपरांचा सन्मान राखत, बिहार प्रगती आणि विकासाचे नवे मापदंड स्थापित करत आहे

Posted On: 22 MAR 2026 10:17AM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी बिहार दिनानिमित्त बिहारमधील जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

एक्स वरील एका संदेशामध्ये केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी सांगितले की, समृद्ध संस्कृती, परंपरा आणि वैशिष्ट्यपूर्ण कलाप्रकारांसाठी ओळखला जाणारा बिहार सामाजिक न्याय आणि बौद्धिक जागृतीच्या मार्गावर देशाला सातत्याने दिशा देत आला आहे. त्यांनी नमूद केले की, नालंदा आणि विक्रमशिला येथील वैभवशाली शिक्षण परंपरेपासून ते स्वातंत्र्यलढा आणि आणीबाणीपर्यंत, बिहारने प्रत्येक काळात भारताच्या राष्ट्रनिर्मितीत अमूल्य योगदान दिले आहे. शाह म्हणाले की, आज आपल्या विशाल वारसा आणि परंपरांचा सन्मान राखत बिहार प्रगती आणि विकासाचे नवे मापदंड स्थापित करत आहे.

***

नितीन फुल्लुके/नितीन गायकवाड/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2243521) अभ्यागत कक्ष : 19