पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केला भारताच्या ऊर्जा संक्रमणावरील एक लेख

प्रविष्टि तिथि: 20 MAR 2026 3:02PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 मार्च 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला. या लेखामध्ये भारताच्या ऊर्जा क्षेत्राच्या परिवर्तनकारी प्रवासाचे वर्णन करण्यात आले आहे.

भारताचे ऊर्जा संक्रमण हे व्यावहारिक धोरण रचना आणि 'आत्मनिर्भरते'च्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे गतिमान होत असल्याचे या लेखात अधोरेखित करण्यात आले आहे.

पंतप्रधानांनी एक्स'' या समाज माध्यमावरील संदेशात लिहिले:

"केंद्रीय राज्यमंत्री @shripadynaik यांनी अधोरेखित केले आहे की, भारताचे ऊर्जा संक्रमण हे व्यावहारिक धोरण आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे पुढे जात आहे.

विद्युतीकरण, स्वच्छ ऊर्जा आणि उत्पादन क्षेत्रावर विशेष भर देत, भारत जागतिक ऊर्जा पटलावर एक निर्णायक अध्याय घडवत आहे.

हा लेख नक्की वाचा!”

 

* * *

नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2242935) आगंतुक पटल : 67
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Bengali-TR , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam