गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी वीरांगना राणी अवंतीबाई लोधी यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
20 MAR 2026 2:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मार्च 2026
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी वीरांगना राणी अवंतीबाई लोधी यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली आहे.
वीरांगना राणी अवंतीबाई लोधीजींचे जीवन धैर्य, त्याग आणि देशभक्तीचे एक अद्वितीय उदाहरण आहे. 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी इंग्रजांविरुद्ध दॐढतेने लढा दिला आणि शरणागती पत्करण्याऐवजी बलिदानाचा पर्याय स्विकारला. त्यांचे बलिदान, राष्ट्राप्रती समर्पण आणि स्वाभिमानाचा चिरकालीन संदेश देते. त्यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन, असे अमित शाह यांनी एक्स या समाज माध्यमावर सामायिक केलेल्या संदेशात म्हटले आहे.
* * *
नेहा कुलकर्णी/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2242919)
आगंतुक पटल : 72