पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांशी दूरध्वनीवर साधला संवाद
पंतप्रधानांनी पश्चिम आशियातील परिस्थितीवर चर्चा करत तणाव कमी करण्याची गरज केली अधोरेखित
प्रविष्टि तिथि:
19 MAR 2026 5:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 मार्च 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधून पश्चिम आशियातील तणाव कमी करण्याची तातडीची गरज व्यक्त करून संवाद आणि मुत्सद्देगिरीकडे परतण्याबाबत चर्चा केली. मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉ यांनी पश्चिम आशिया तसेच जागतिक पातळीवर शांतता व स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी परस्पर समन्वय कायम ठेवण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
पंतप्रधानांनी ‘एक्स’वर लिहिले :
“माझे प्रिय मित्र, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्याशी पश्चिम आशियातील परिस्थिती आणि तणाव कमी करण्याची तातडीची गरज तसेच संवाद आणि मुत्सद्देगिरीचा अवलंब करण्याबद्दल चर्चा केली.
प्रदेशात तसेच जागतिक पातळीवर शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी आमचा परस्पर समन्वय पुढेही कायम राहील, अशी अपेक्षा आहे.”
* * *
राधिका अघोर/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2242611)
आगंतुक पटल : 74
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam