गृह मंत्रालय
जागतिक वन्यजीव दिनाच्या निमित्ताने निसर्गाशी सुंसंवादी जीवन जगण्याच्या भारतीयांच्या कालातीत परंपरेची उजळणी करुया - केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन
दिमाखदार वाघ ते सर्वात छोटा प्राणी , प्रत्येक सजीव आपल्या पर्यावरणाचे संतुलन राखत असतो
भावी पिढ्यांसाठी वन्यजीवनाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा आपला निर्धार दृढ करण्याचा हा दिवस आहे
प्रविष्टि तिथि:
03 MAR 2026 2:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मार्च 2026
निसर्गाशी सुंसंवादी जीवन जगण्याच्या भारतीयांच्या कालातीत परंपरेची उजळणी करण्याचे आवाहन केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज जागतिक वन्यजीवन दिनाच्या निमित्ताने नागरिकांना केले.
एक्स या समाजमाध्यमावरच्या संदेशात अमित शाह यांनी म्हटले आहे की “जागतिक वन्यजीवन दिनाच्या निमित्ताने निसर्गाशी सुंसंवादी जीवन जगण्याच्या भारतीयांच्या कालातीत परंपरेची उजळणी करुया.दिमाखदार वाघापासून सर्वात छोट्या प्राण्यापर्यंत, प्रत्येक सजीव आपल्या पर्यावरणाचे संतुलन राखत असतो. या दिवसाच्या निमित्ताने भावी पिढ्यांसाठी वन्यजीवनाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा आपला निर्धार दृढ करुया.”
अंबादास यादव/विजया सहजराव/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2234968)
आगंतुक पटल : 65
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam