पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 मार्च रोजी ‘शाश्वत आणि सशक्त आर्थिक विकास’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला करणार संबोधित

प्रविष्टि तिथि: 02 MAR 2026 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 मार्च 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 मार्च 2026 रोजी सकाळी 11:15 वाजता ‘शाश्वत आणि सशक्त आर्थिक विकास’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला दूरदृश्य प्रणालीमार्फत संबोधित करणार आहेत.

या संकल्पनेअंतर्गत  चार स्वतंत्र वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे - (i) वस्तुनिर्माण, औद्योगिक उन्नती आणि धोरणात्मक क्षेत्रे (ii) सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, वित्त आणि बाजारपेठ प्रवेश (iii) शहरी आर्थिक क्षेत्रे (iv) पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स आणि मालवाहतूक 

या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये औद्योगिक क्षमता विस्तार, तांत्रिक अग्रगण्यता  अधिक निपुण  करणे आणि महत्त्वाच्या क्षेत्रांची पायाभूत रचना मजबूत करण्यासाठी करण्यात येत असलेल्या दूरदर्शी सुधारणांवर प्रकाश टाकण्यात येईल. उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींच्या प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे या प्राधान्यक्रमांचे प्रभावी कृतीत रूपांतर कसे करावे यावर सविस्तर चर्चा होणार आहे.  


सोनाली काकडे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2234777) आगंतुक पटल : 113
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , Tamil , Telugu , Assamese , Odia , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Malayalam