पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुदुचेरी येथे ₹ 2,700 कोटींहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी कार्यक्रमादरम्यान केलेल्या भाषणाची काही क्षणचित्रे सामायिक केली
Posted On:
01 MAR 2026 6:03PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुदुचेरी येथे ₹ 2,700 कोटींहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी कार्यक्रमादरम्यान केलेल्या आपल्या भाषणाची काही क्षणचित्रे सामायिक केली.
X वरीलपोस्टच्या मालिकेत पंतप्रधान मोदी म्हणाले;
“पुदुचेरीतील अद्भुत जनतेमध्ये उपस्थित राहून आनंद झाला. आज अनेक विकासकामांची सुरुवात होत आहे, ज्यामुळे जीवनमान सुलभ होईल आणि प्रदेशाच्या आर्थिक वाढीस चालना मिळेल.”
“वनक्कम पुडुचेरी!
विविध विकासकामांच्या शुभारंभासाठी पुदुचेरीतील माझ्या बंधू -भगिनींमध्ये उपस्थित राहून आनंद झाला. डबल-इंजिनवाल्या एनडीए सरकारने जनतेच्या कल्याणासाठी व्यापक काम केले आहे.”
“गेल्या पाच वर्षांत बेस्ट (BEST) पुदुचेरी उभारण्याच्या दृष्टिकोनानुसार पुदुचेरीने विक्रमी विकास अनुभवला आहे.”
“पुदुचेरीतील युवकांना आम्ही कशाप्रकारे सक्षम करत आहोत, ते येथे पाहा…”
“पुदुचेरीला वैद्यकीय पर्यटन आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवेचे केंद्र बनवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”
“कॉंग्रेसने पुदुचेरीला दिल्लीतील केवळ एका कुटुंबाची सेवा करणारे एटीएम बनवले. त्यामुळेच पुदुचेरी कधीही कॉंग्रेस आणि त्याच्या सहयोगींना मतदान करणार नाही.”
***
सुषमा काणे/नितीन गायकवाड/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2234275)
अभ्यागत कक्ष : 11