गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जम्मू-कश्मीरने प्रथमच रणजी ट्रॉफी जिंकत इतिहास रचला; केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा यांनी केले अभिनंदन

Posted On: 28 FEB 2026 7:44PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 फेब्रुवारी 2026

 

जम्मू-कश्मीरने प्रथमच रणजी ट्रॉफी जिंकल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी अभिनंदन केले आहे.

‘X’वरील आपल्या संदेशात अमित शहा यांनी म्हटले आहे:

“जम्मू-कश्मीरने प्रथमच रणजी ट्रॉफी जिंकत इतिहास रचल्याबद्दल त्या प्रदेशातील प्रत्येक युवकाचे आणि विशेषतः जम्मू-कश्मीर क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन. हा क्षण प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करणारा आहे. जम्मू-कश्मीरमध्ये घडत असलेले नवे बदल हे तेथील युवकांची नवी ओळख ठरत आहेत, याचे हे प्रतीक आहे. शांतता, प्रगती आणि समृद्धी हे ‘नव्या जम्मू-कश्मीर’चे प्रेरणामंत्र आहेत.”

 

* * *

माधुरी पांगे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2234020) अभ्यागत कक्ष : 10