पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी कुनो राष्ट्रीय उद्यानात केले बोत्सवानातून आलेल्या 9 चित्त्यांचे स्वागत
प्रविष्टि तिथि:
28 FEB 2026 6:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2026
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी 28 फेब्रुवारी 2026 रोजी, बोत्सवानाकडून मिळालेल्या नऊ चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात त्यांच्यासाठी केलेल्या बंदिस्त जागेत सोडले. त्यांना हळूहळू जंगलात मुक्त संचार करण्यास सोडण्यापूर्वी या प्राण्यांना येथील हवामानाशी जुळवून घेण्याच्या आणि आरोग्यावर देखरेखीच्या टप्प्यातून जावे लागेल.
'X' समाज माध्यमावरील पोस्टमध्ये, यादव यांनी, बोत्सवानातून मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आलेल्या नऊ चित्त्यांमध्ये 6 मादी आणि 3 नरांचा समावेश असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या पर्यावरणदृष्ट्या सजग नेतृत्वाखाली प्रोजेक्ट चित्ताला मोठे यश मिळाले आहे, अशी माहिती मंत्र्यांनी दिली. भारतातील चित्त्यांची संख्या वाढून आता 48 झाली आहे, त्यामध्ये भारतात जन्मलेल्या 28 बछड्यांचा समावेश आहे.
यादव यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या आणखी एका पोस्टमध्ये, या प्राण्यांना सुरक्षितपणे भारतात पोहोचवण्यासाठी भारतीय हवाई दलाने अत्यंत उत्तम समन्वय राखून, अचूक वेळेत उड्डाणे करून दाखवलेल्या अढळ वचनबद्धतेबद्दल भारतीय हवाई दलाचे कौतुक केले आहे.
* * *
माधुरी पांगे/मंजिरी गानू/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2233975)
आगंतुक पटल : 91