पंतप्रधान कार्यालय
मारुफ रझा यांच्या निधनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
26 FEB 2026 11:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मारुफ रझा यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाला आदरांजली वाहिली आहे.
मारुफ रझा यांनी पत्रकारिता जगताला उल्लेखनीय योगदान देऊन समृद्ध केले, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यांना संरक्षण, राष्ट्रीय सुरक्षा आणि धोरणात्मक बाबींविषयी उत्तम जाण होती आणि त्यातून सार्वजनिक चर्चा त्यांनी समृद्ध केली, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
रझा यांच्या निधनामुळे दुःख झाल्याचे आणि त्यांचे कुटुंबीय व स्नेही यांच्या दुःखात सहभागी असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर म्हटले आहे:
''श्री मारुफ रझा यांनी पत्रकारिता जगताला उल्लेखनीय योगदान देऊन समृद्ध केले. त्यांना संरक्षण, राष्ट्रीय सुरक्षा आणि धोरणात्मक बाबींविषयी उत्तम जाण होती आणि त्यातून सार्वजनिक चर्चा त्यांनी समृद्ध केली. त्यांच्या निधनामुळे दुःख झाले आहे. त्यांचे कुटुंबीय व स्नेही यांच्या दुःखात सहभागी आहे.''
* * *
नेहा कुलकर्णी/सोनाली काकडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2233463)
आगंतुक पटल : 60
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam