रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अग्निवीर आणि सेवेत असलेल्या लष्करी कर्मचाऱ्यांना निवृत्तीपश्चात करिअरच्या संधी प्रबळ होण्यासाठी भारतीय रेल्वे आणि भारतीय लष्कर यांच्यातील 'सहकार्याची रुपरेषा' जारी

Posted On: 26 FEB 2026 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2026

अग्निवीर आणि नागरी जीवनात संक्रमित होणाऱ्या सध्या सेवेत असलेल्या लष्करी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भारतीय रेल्वे आणि भारतीय लष्कराने संस्थात्मक सहकार्य वाढवण्याच्या दिशेने उल्लेखनीय पाऊल म्हणून "सहकार्याची रुपरेषा" सादर केली आहे.

लष्करी सेवेतून नागरी कारकिर्दीत सुलभपणे संक्रमण  सुनिश्चित होण्याच्या अनुषंगाने लष्कर आणि रेल्वे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील या उपक्रमाची आखणी  करण्यात आली आहे. यामुळे रेल्वे खात्यातील नोकरीच्या संधींबद्दल सजगता निर्माण होईल तसेच लष्करी सेवेतून निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी समर्पित आधार प्रणाली तयार होईल.

ही सहकार्यासंबंधीची रुपरेषा व्यापक राष्ट्रीय विकास उद्दिष्टांना सहाय्यक ठरण्यासोबतच माजी सैनिकांना करिअरचे इतर अर्थपूर्ण मार्ग उपलब्ध करुन देण्याप्रती सामायिक वचनबद्धता अधोरेखित करणारी आहे.

माजी सैनिकांसाठी नोकरीच्या प्रमुख संधी

सैन्य दलातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि पुनर्वसन हा भारतीय रेल्वेच्या धोरणात्मक चौकटीचा महत्त्वाचा घटक आहे.

माजी सैनिक आणि माजी अग्निवीरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी:

• माजी सैनिकांसाठी स्तर-2/वरील पदांमध्ये 10% सरळ आरक्षण आणि स्तर-1 पदांमध्ये 20% आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.

• याव्यतिरिक्त, माजी अग्निवीरांसाठी स्तर-2/ त्यावरील पदांमध्ये 5% तर स्तर-1 पदांमध्ये 10%  जागा  राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

2024 आणि 2025 या वर्षांमध्ये, रेल्वेतील रिक्त पदांच्या अधिसूचनांमध्ये एकूण 14,788 पदे माजी सैनिकांसाठी राखीव ठेवण्यात आली होती, त्यामध्ये समाविष्ट असलेली पदांची संख्या:

• स्तर-1 मधील 6,485 पदे

• स्तर-2/त्यावरील 8,303 पदे  

कंत्राटी नियुक्त्यांद्वारे तात्काळ सहभाग

माजी सैनिकांच्या जलद गतीने नियुक्त्या करण्यास चालना देण्यासाठी आणि विद्यमान रिक्त पदांची पूर्तता करण्यासाठी, रेल्वे मंत्रालयाने नियमित भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत भारतीय रेल्वेमध्ये माजी सैनिकांची 'पॉइंट्समेन' म्हणून कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या झोनल आणि डिव्हिजनल पातळीवर 5,000 हून अधिक स्तर-1 पदांच्या भरतीसाठीची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत 9 डिव्हिजन्सनी 'पॉइंट्समेन'च्या नियुक्तीसाठी संबंधित लष्करी संघटनांसोबत सामंजस्य करार केले आहेत.

सुषमा काणे/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2233227) अभ्यागत कक्ष : 15