PIB Headquarters
M.A.N.A.V.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मानव-केंद्रीत कृत्रिम बुद्धिमत्ता यात्रा
Posted On:
19 FEB 2026 5:21PM by PIB Mumbai

इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 मध्ये भारत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्यासंदर्भात सखोल चर्चा करण्यासाठी जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील नेते आणि धोरणकर्ते यांना एकत्र आणत आहे. भारत मंडपम येथे, होत असलेल्या या चर्चांमध्ये मानव केंद्रीत कृत्रिम बुद्धिमत्तेला आकार देण्याची सामायिक आकांक्षा प्रतिबिंबित करतात. इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 16-20 फेब्रुवारी 2026 दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे.
जगातील एक षष्ठांश लोकसंख्येचे घर, जगातील सर्वात मोठा युवा गट आणि सर्वात गतिमान तंत्रज्ञान कौशल्य संपन्न मनुष्यबळ असलेला भारत उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा निर्माता आणि जलद अवलंबक म्हणून उभा आहे. हे अद्वितीय स्थानामुळे भारतावर केवळ प्रमाणच नाही तर जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता चर्चेला आकार देण्याची जबाबदारी देखील येते.
19 फेब्रुवारी रोजी इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेतील आपल्या उद्घाटनप्रसंगी दिलेल्या भाषणात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेकडे केवळ डेटा आणि अल्गोरिदमद्वारे चालणारी स्वायत्त शक्ती म्हणून न पाहता, मानवी आकांक्षा, नीतिमत्ता आणि सन्मानाच विस्तार म्हणून पाहण्याचा एक सूक्ष्म दृष्टिकोन मांडला. त्यांनी या मानव-केंद्रीत दृष्टिकोनाचे वर्णन M.A.N.A.V. या संक्षिप्त रूपात केले, जिथे तांत्रिक प्रगती सामाजिक मूल्यांशी सुसंगतपणे प्रगती करते: नैतिक आणि मूल्याधारित प्रणाली, जबाबदार शासन, राष्ट्रीय सार्वभौमत्व, सुलभ आणि समावेशक कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच वैध आणि कायदेशीर प्रणाली.
भारताची M.A.N.A.V. संकल्पना ही केवळ पंतप्रधानांनी मांडलेली एक संकल्पनात्मक चौकट नसून; ती एका समन्वित कार्यक्रम आणि धोरणात्मक उपक्रमांद्वारे एक मजबूत पाया बांधण्यासाठी चालू असलेल्या राष्ट्रीय वचनबद्धतेचे देखील प्रतिबिंबित करते. हे उपाय मार्गदर्शक तत्त्वांना शिक्षण, डिजिटल पायाभूत सुविधा, प्रशासन आणि नवोन्मेष परिसंस्था यामधील समन्वित कार्यक्रम आणि धोरणात्मक उपक्रमांद्वारे ती प्रत्यक्षात साकारली जात आहेत. समावेशकता, सुरक्षा आणि सार्वजनिक हित या तत्त्वावर आधारित भारताची कृत्रिम बुद्धिमत्ता रणनीती भविष्याभिमुख आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार आहे. एकत्रितपणे, ते अधोरेखित करतात की ही दृष्टी ठोस कृती आणि सातत्यपूर्ण संस्थात्मक बांधिलकीवर आधारित आहे.
मानव दृष्टिकोनाचा पहिला आधारस्तंभ अधोरेखित करतो की कृत्रिम बुद्धिमत्ता मजबूत नैतिक मूल्यांवर आधारित असावी. पंतप्रधानांनी हे स्पष्ट केले की निष्पक्षता, पारदर्शकता आणि मानवी देखरेख ही कृत्रिम बुद्धिमत्ता डिझाइन आणि अंमलबजावणीतील अविभाज्य तत्त्वे आहेत. भारत हे मूल्य लहानपणापासूनच रुजवत आहे. शिशु वर्गांमध्ये रुजलेली ही मूल्ये संपूर्ण समाजापर्यंत पोहोचत आहेत.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता साक्षरतेला प्राधान्य देण्यात आले आहे. शालेय स्तरापासून संगणकीय विचारसरणी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता संकल्पनांचा समावेश करून विद्यार्थ्यांना हे डेटा-आधारित निर्णयप्रक्रिया आणि नैतिक कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी जागरूक केले जात आहे. यामुळे वेगाने विकसित होणाऱ्या तांत्रिक परिदृश्याकरिता भविष्यासाठी सज्ज नागरिकांना तयार होत असताना नवोन्मेषाची संस्कृती वाढीस लागते.
शिखर परिषदेत नैतिकतेला सार्वजनिक पाठबळ लाभले. परिषदेदरम्यान भारताने 24 तासांच्या आत कृत्रिम बुद्धिमत्ता जबाबदारी मोहिमेसाठी प्राप्त झालेल्या सर्वाधिक प्रतिज्ञांसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा किताब मिळवून जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता सहभागात जागतिक बेंचमार्क स्थापित केला. तब्बल 2,50,946 प्रतिज्ञांनी नैतिक कृत्रिम बुद्धिमत्ता ही केवळ धोरणात्मक संकल्पना न ठेवता तिचे सामूहिक राष्ट्रीय वचनबद्धतेत रूपांतर केले.
M.A.N.A.V दृष्टीचा दुसरा आधारस्तंभ - जबाबदार प्रशासन, पारदर्शक नियम आणि मजबूत देखरेख, हे बळकट करते की कृत्रिम बुद्धिमत्ता वरील विश्वास पारदर्शकता, सक्षम देखरेख आणि स्पष्ट संस्थात्मक जबाबदारीवर आधारित असावा.
या दृष्टिकोनाचा केंद्रबिंदू म्हणजे -- इंडिया एआय मिशन. या मिशनसाठी 10,300 कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. हा उपक्रम केवळ संगणन क्षमता, डेटा, कौशल्य आणि नवोन्मेष क्षमता मजबूत करत नाही तर कृत्रिम बुद्धिमत्ता परिसंस्थेत सुरुवातीपासूनच प्रशासन यंत्रणा देखील अंतर्भूत करतो. जबाबदार विकास, अंमलबजावणी आणि देखरेख यासाठी मानके निश्चित करून, हे मिशन सार्वजनिक क्षेत्रातील उपयोग आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीवर संरचित देखरेख सुनिश्चित करते आहे.
भारताची कृत्रिम प्रज्ञा संदर्भातील (एआय) प्रशासकीय मार्गदर्शक तत्त्वे याला पूरक आहेत, जी विश्वास, समता, जबाबदारी आणि निष्पक्षतेवर आधारित जन-केंद्रित चौकट अधोरेखित करतात. एकत्रितपणे, हे उपाय भारतातील एआय प्रणाली स्पष्ट, कायदेशीर आणि लोकशाही मूल्ये आणि संवैधानिक तत्त्वांशी सुसंगत राहतील अशा प्रकारची एक पारदर्शक नियंत्रक रचना असल्याची खात्री देतात.
राष्ट्रीय सार्वभौमत्व हा MANAV दृष्टिकोनाचा तिसरा आधारस्तंभ आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित जगात, सार्वभौमत्वाच्या प्रादेशिक सीमांच्या पलीकडे जाऊन डेटा, अल्गोरिदम आणि डिजिटल पायाभूत सुविधांचा समावेश करते, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केले. भारतासाठी, याचा अर्थ महत्त्वपूर्ण डेटासेट सुरक्षित करणे, देशांतर्गत संगणकीय क्षमता मजबूत करणे आणि स्वदेशी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रारुपाच्या विकासाला चालना देणे असा आहे.
इंडिया सेमीकंडक्टर मिशन, विश्वासार्ह डेटा गव्हर्नन्स फ्रेमवर्क आणि सुरक्षित डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक यासारखे उपक्रम डिजिटली वेगळे न होता तांत्रिक स्वावलंबनाप्रती वचनबद्धता दर्शवतात.
चिप्स, क्लाउड आणि प्रगत तंत्रज्ञानामध्ये देशांतर्गत लवचिक क्षमता निर्माण करून, भारत त्याची एआय इकोसिस्टम जागतिक स्तरावर सहयोगात्मक तरीही धोरणात्मकदृष्ट्या स्वायत्त राहील, बुद्धिमान प्रणालींच्या युगात आर्थिक सुरक्षा आणि लोकशाही संस्थांचे रक्षण करेल, हे,सुनिश्चित करत आहे.
MANAV चा चौथा स्तंभ म्हणजे सुलभ आणि सर्वसमावेशकता कृत्रिम प्रज्ञा. कृत्रिम प्रज्ञेने काही विशेषाधिकारप्राप्त लोकांची मक्तेदारी न मानता समाजासाठी गणितीय पद्धतीने विकासक म्हणून काम केले पाहिजे.
भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमुळे आरोग्यसेवा, शिक्षण, शेती आणि प्रशासनात एआय सोल्यूशन्सचा वापर जलद आणि परवडणाऱ्या दरात होऊ लागला आहे. जीआय क्लाउड आणि इंडियाएआय कॉम्प्युट पोर्टल सारखे प्लॅटफॉर्म ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स (जीपीयू) आणि टेन्सर प्रोसेसिंग युनिट्स (टीपीयू) यासारख्या सामायिक संगणकीय संसाधनांच्या प्रवेशाचे लोकशाहीकरण करत आहेत, ज्यामुळे स्टार्टअप्स, संशोधक आणि संस्थांसाठी प्रवेश अडथळे लक्षणीयरीत्या कमी होतात.
इंडियाएआय कोश विविध क्षेत्रांमध्ये डेटासेट आणि एआय मॉडेल्स प्रदान करते, तर एआय डेटा लॅब्स नेटवर्क आणि नॅशनल सुपरकॉम्प्युटिंग मिशन देशभरातील तळागाळातील कौशल्ये आणि उच्च-कार्यक्षमता संगणकीय क्षमता मजबूत करत आहेत. एकत्रितपणे, हे उपक्रम भारतातील एआय नवोपक्रम व्यापक, परवडणारे आणि समावेशक राहील असे सुनिश्चित करतात.
MANAV चा पाचवा स्तंभ एआय तैनातीच्या केंद्रस्थानी विश्वास, सुरक्षितता आणि कायद्याला अनुसरतो. एआय सिस्टम्स पडताळणीयोग्य, कायदेशीर आणि पारदर्शक असायला हव्यात, विशेष करून ज्यावेळी डीपफेक आणि सिंथेटिक मीडिया लोकशाहीतत्वे आणि सामाजिक विश्वासाला धोका निर्माण करतात, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया नीतिमत्ता संहिता) सुधारणा नियम, 2026 औपचारिकपणे कृत्रिमरित्या तयार केलेल्या सामग्रीची व्याख्या आणि नियमन करते, ज्यामुळे डिजिटल परिसंस्थेमधील जबाबदारी मजबूत होते.
कार्यपातळीवर, इंडिया एआय मिशनचा सेफ अँड ट्रस्टेड एआय स्तंभ पूर्वाग्रह कमी करणे, गोपनीयता-संरक्षण प्रणाली डिझाइन, अल्गोरिदमिक ऑडिटिंग साधने आणि जोखीम मूल्यांकन फ्रेमवर्कवर लक्ष केंद्रीत करणाऱ्या प्रकल्पांना समर्थन देतो. हे सुरक्षा उपाय नैतिक हेतूचे अंमलबजावणीयोग्य मानकांमध्ये रूपांतर करतात, ज्यामुळे एआय नवोपक्रम विश्वासार्ह, जबाबदार आणि सामाजिकदृष्ट्या लाभदायक राहील याची खात्री होते.
MANAV च्या माध्यमातून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ एक दृष्टिकोनच मांडला नाही; त्यांनी जगासमोर कृत्रिम बुद्धिमत्तेवर एक सभ्यतावादी दृष्टिकोन सादर केला आहे.
नवोपक्रमाला नीतिमत्तेशी, प्रशासनाला जबाबदारीशी, सार्वभौमत्वाला मोकळेपणाशी, समावेशनाला प्रमाणाशी आणि वैधतेला विश्वासाशी जोडून, भारत एक असे एआय भविष्य घडवत आहे जे केवळ तंत्रज्ञानालाच नव्हे तर मानवतेलाही पुढे नेईल.
***
NitinFulluke / ShradhhaMukhedkar / SampadaPatgaonkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2232976)
अभ्यागत कक्ष : 37
Read this releasein:
English
,
Gujarati
,
Urdu
,
Nepali
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Kannada