माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत सरकार आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने भारतीय सिनेसृष्टीला मिळत असलेली जागतिक ओळख केली साजरी


बाफ्टा 2026 मध्ये लक्ष्मीप्रिया देवी यांच्या 'बूंग' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपटाचा पुरस्कार

Posted On: 25 FEB 2026 10:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 फेब्रुवारी 2026

 

बाफ्टा चित्रपट पुरस्कार 2026 मध्ये लक्ष्मीप्रिया देवी यांच्या ‘बूंग’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपटाचा पुरस्कार मिळविला आहे. बाफ्टा चित्रपट पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपट पुरस्कार जिंकल्याबद्दल भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने चित्रपट दिग्दर्शक लक्ष्मीप्रिया देवी आणि ‘बूंग’ या चित्रपटाच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले आहे. हे ऐतिहासिक यश भारतीय सिनेमासाठी अभिमानाचा क्षण असून, भारताच्या वैविध्यपूर्ण आणि अर्थपूर्ण कथाकथन परंपरेला मिळत असलेली वाढती जागतिक पसंती अधोरेखित करत आहे.

या चित्रपटाच्या प्रवासाला भारताच्या चित्रपट विकास आणि महोत्सव परिसंस्थेने पाठबळ दिले. बूंग या चित्रपटाची निर्मिती 2023 च्या फिल्म बझार मध्ये वर्क इन प्रोग्रेस लॅब आणि फिल्म बझार रेकमेंडेस इन, अंतर्गत करण्यात आली होती. होतकरू चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देणे आणि जागतिक उद्योगात सहभागी व्हायला त्यांना सहाय्य करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर हा चित्रपट 2024 मध्ये 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला, तिथे सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक श्रेणीत त्याची निवड झाली, आणि तो समीक्षकांच्या प्रशंसेला पात्र ठरला.

भारत सरकार आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ फिल्म बझार आणि भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यासारख्या व्यासपीठांना बळकटी देण्यासाठी वचनबद्ध आहे. हे व्यासपीठ चित्रपट निर्मात्यांना सक्षम बनवते, त्यांच्या सृजनशीलतेची जोपासना करते आणि भारतीय सिनेमाला आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग तयार करते.  

 

* * *

निलिमा चितळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2232912) अभ्यागत कक्ष : 16