पंतप्रधान कार्यालय
एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 च्या यशस्वी सांगतेबाबतचा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
Posted On:
24 FEB 2026 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026च्या यशस्वी सांगतेबाबत केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी लिहिलेला उत्कृष्ट लेख सामायिक केला आहे. आपल्या लेखात केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केले आहे की, भारताने आपल्या सभ्यतागत प्रेरणेतून मार्गदर्शन घेतले.
केंद्रीय मंत्र्यांनी पुढे अधोरेखित केले आहे की, भारत डेटावर सार्वभौमत्व, संरेखनाद्वारे समावेशकता आणि पूर्वनिर्धारित उत्तरदायित्व या तत्त्वांवर आधारित स्वतःची मार्गदर्शक संकल्पना पुढे मांडत आहे.
पंतप्रधान कार्यालयाने एक्सवर म्हटले आहे:
“या उत्कृष्ट लेखात केंद्रीय मंत्री श्री @HardeepSPuri यांनी एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 च्या यशस्वी सांगतेबाबत लिहिले असून, भारताने आपल्या सभ्यतागत प्रेरणेतून मार्गदर्शन घेतल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच, डेटावर सार्वभौमत्व, संरेखनाद्वारे समावेशकता आणि पूर्वनिर्धारित उत्तरदायित्व या तत्त्वांवर आधारित आपली स्वतःची मार्गदर्शक संकल्पना पुढे मांडत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.”
सोनाली काकडे/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2232465)
अभ्यागत कक्ष : 10